दक्षिण गोवा जिल्हाधिकारीपदी तारीक थॉमस

0
78

राज्य प्रशासनाच्या सचिव पदांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल
राज्य प्रशासनातील सचिवांच्या पदांमध्ये बदल करण्यात आला आहे. उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांची बदली करण्यात आली असून दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी म्हणून आयएएस अधिकारी तारीक थॉमस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

उत्तर गोवा जिल्हाधिकारीपदाचा तात्पुरता ताबा नीला मोहनन यांच्याकडे देण्यात आला आहे. मोहनन यांची शिक्षण, वीज, अपारंपरिक ऊर्जा, रोजगार व मजूर आणि महसूल सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी अंजली शेरावत यांची गृह खात्याच्या विशेष सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कार्मिक खात्याचे अवर सचिव शशांक ठाकूर यांनी २ जुलै रोजी सचिवांच्या पदांमध्ये बदलाचा आदेश जारी केला. मुख्य सचिव धर्मेंद्र शर्मा यांच्याकडे गृह, दक्षता, कार्मिक, कायदा, प्रशासकीय सुधारणा व वन खाते ही खाती ठेवण्यात आली आहेत. पी. कृष्णमूर्ती यांची मुख्यमंत्र्याचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती केली. तसेच त्यांच्याकडे दिल्लीतील निवासी आयुक्तपदाचा अतिरिक्त ताबा असेल.
डब्ल्यू.व्ही. रमणमूर्ती यांच्याकडे सहकार, समाज कल्याण, नागरी उड्डाण, सर्वसामान्य प्रशासन, राजभाषा तर एस.पी. सिंग यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम, वाहतूक व पर्यटन खात्याचे सचिवपद देण्यात आले आहे.

दौलत हवालदार यांच्याकडे वित्त, खाण, कला-संस्कृती, आदिवासी कल्याण, नियोजन, मत्स्यव्यवसाय, नगर नियोजन व कृषी खात्याचे सचिवपद देण्यात आले आहे. पी. एस. रेड्डी यांच्याकडे जलस्त्रोत खात्याचा ताबा ९ जुलै २०१८ पर्यत राहणार आहे.

सुधीर महाजन यांच्याकडे नगर विकास, उद्योग, माहिती व प्रसिद्धी व सार्वजनिक गार्‍हाणी खात्याचा ताबा देण्यात आला आहे. रुपेश ठाकूर हे राज्यपालांचे सचिव असतील. त्याशिवाय त्यांच्याकडे संग्रहालय, मुद्रणालय, नागरी पुरवठा व गॅझेट ही खाती सोपविण्यात आली आहेत.टअमेय अभ्यंकर मनोरंजन सोसायटीचे सीईओ, माहिती तंत्रज्ञान खात्याचे सचिव व राज्य लोक सेवा आयोगाचे सदस्य सचिव म्हणून काम पाहतील.

गोविंद जयस्वाल यांच्याकडे बंदर, नदी परिवहन, दक्षता खात्याचे विशेष सचिव, वजन माप, कारखाने व बाष्पक, हस्तकला, तर जे. अशोक कुमार यांची मुख्यमंत्र्यांचे विशेष सचिवपदी नियुक्ती केली आहे. तसेच आरोग्य, क्रीडा, महिला व बाल कल्याण, क्राफ्स्टमन ट्रेनिंगचे आणि स्वच्छ भारत अभियानाचे नोडल अधिकारिपदी नियुक्ती करण्यात आली आहे.