थिवी येथे युवकाला ट्रकने चिरडले

0
272

माडेल, थिवी येथील मार्गावर काल सकाळी साडेअकराच्या सुमारास एका स्कूटर चालकाचा चालत्या वाहनावरील ताबा सुटला. त्यावेळी त्याच्यामागून येणार्‍या ट्रकच्या मागच्या चाकाखाली सापडून आग्नेलो ऊर्फ फ्रान्सिस कामिलो डिसोझा (४५, माडेल, थिवी) हा युवक जागीच ठार झाला. पुढील तपास उपनिरीक्षक अनिल पोळेकर करीत आहेत.