थायलंडमध्ये अडकलेल्या ६ खेळाडूना बाहेर काढले

0
123

तब्बल १६ दिवसांनंतर थायलंडच्या गुहेत अडकलेल्या १२ पैकी ६ मुलांना बाहेर काढण्यात बचावपथकाला यश आले आहे. गुहेत अडकलेले १२ खेळाडू आणि एका प्रशिक्षकाला वाचण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू आहेत. १३ विदेशी पाणबुडे आणि थायलंडच्या नौदलाचे ५ कमांडो या मुलांना बाहेर काढण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. सहा मुलांना वाचवण्यात आल्याने आता उर्वरित मुले वाचण्याची आशा वाढली आहे. सर्व मुले बाहेर काढण्यासाठी किमान २ ते ४ दिवस लागू शकतात, अशी माहिती या मोहिमेत सहभागी एका लष्कराच्या कमांडरने दिली.