त्वचारोग आणि होमिओपॅथी

0
1338

– डॉ. संजना नाईक

होमिओपॅथिक उपचारांमध्ये रुग्णाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्वचारोगाचा प्रसार किंवा तो जास्त पसरू नये याची काळजी घेतली जाते. त्याशिवाय रुग्णाने अतिशय आंबट पदार्थ.. जसे लोणचे, आंबट दही, लिंबू जातीतील फळे तसेच मांसाहारी जेवण आणि कृत्रिम रंग जेवणात वापरणे टाळावे.

त्वचारोग (व्हिटीलीगो) हा त्वचेत असणार्‍या ‘मेलेनीन’ नावाच्या रंगद्रव्यामुळे होणारा एक रोग आहे. वैद्यकियदृष्ट्या त्वचारोग हा काही गंभीर किंवा फार मोठा आजार नाही. या रोगाला वैद्यकीय महत्त्वापेक्षा सामाजिक महत्त्व जास्त आहे, कारण त्यामुळे आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची इजा, जखम किंवा शरीराचे नुकसान होत नाही.
कृत्रिमरित्या आणि वैयक्तिकरित्या याचा त्रास जास्त करून त्या समाजात राहणार्‍या लोकांच्या जीवनावर होऊ शकतो- ज्या ठिकाणी तपकिरी आणि गडद त्वचेच्या लोकांमध्ये त्वचेच्या रंगास जास्त महत्त्व दिले जाते. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर त्वचारोग हा खालीलपैकी एका कारणामुळे होतो.
१) मेलेनीन नावाच्या पेशी नष्ट होणे- त्वचेचा रंग कमी होण्यास कारण ठरणे – पांढर्‍या रंगाचा ठिपका होणे – त्वचारोग होणे.
२) शरीरात मेलेनीन तयार होणार्‍या प्रतिक्रियेत दोष तयार होतात आणि म्हणूनच त्वचेचा रंग तयार होत नाही.

चिन्ह आणि कारणेः-

त्वचारोगाचे नेमके स्वरुप म्हणजे दुधाळ पांढर्‍या (व्हाईटनेस) रंगाचे हे डाग एक किंवा त्यापेक्षा जास्त पांढर्‍या रंगाच्या डागांमध्ये बदलू शकतात. डागांचा आकार हा गोल किंवा वेगवेगळ्या आकाराचा असू शकतो. काहीवेळा सर्वसाधारण रंगद्रव्य सगळ्या शरीरात दिसतात. त्यामध्ये प्रथम एक डाग सुरू होऊन त्याचा आकार आणि संख्या वाढवली जाते. हे डाग अंगावर किंवा ओटीपोटात किंवा शरीराच्या मागील भागात एक किंवा एकापेक्षा जास्त आणि मग सर्व भागांत पसरतात. काही प्रकरणात ठिपक्यांच्या जागेवरील केस मेलेनीन रंगद्रव्य मुळात कमी झाल्यामुळे तपकिरी रंगाचे झालेले दिसतात.

कारणे ः-
त्वचारोग हा एक आजार आहे, याचे नक्की कारण अजूनपर्यंत पूर्णपणे समजले नाही. बहुतेक प्रकरणात त्वचारोगाकरिता जबाबदार असणारी किंवा तो का होतो याची खूप कारणे आहेत.

त्वचारोग ः- – बदललेली प्रतिकारशक्ती- – – अनुवंशिकता
ताण- – व्यावसायिक
हार्मोन्स, आघात आणि औषधे

यामध्ये २०%-३०% ह्या कौटुंबिक घटना दिसतात.
याचा अभ्यास केल्यावर असे दिसून येते की कुटुंबातील (घरातील) एक व्यक्ती ( आई, वडील, आजी, आजोबा, काका, काकी, भावंडं) हे एक किंवा त्यापेक्षा जास्त आजाराने आजारी आहेत. जसे…
१) त्वचारोग २) हायपोथायरॉईड, ३) मधुमेह, इन्सुलिनच्या कमीपणामुळे रक्तात व लघवीत साखर दिसणे ४) अलोपेशीया आयरेटा, ५) कर्करोग, ६) संधीवात, ७) सोरॅसिस इत्यादी.

उपचार ः- होमिओपॅथी त्वचारोगावर व त्याच्या कारणांसाठी अतिशय योग्य उपचार देतात. पण त्याचा जास्त प्रसार केला जात नाही. त्वचारोगावर लवकर व सौम्य (हानी नसलेला) उत्तम उपाय केला जाऊ शकतो. तसेच त्वचारोगाचे नियंत्रण किंवा तो जास्त न पसरण्याची सोय करता येते.
होमिओपॅथिक उपचार पुढील पद्धतीने कमी करता येतात.
१) रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्वचारोगाचा प्रसार किंवा तो जास्त पसरू नये याची काळजी घेतली जाते.
२) नैसर्गिकरित्या शरीरातील मेलानोसायटीसची निर्मिती वाढवली जाते. (खरबूज)
३) ज्वलनशास्त्राचे औषध नियंत्रित करते.
४) पर्यावरणातील घटक जसे रसायनांच्या प्रक्रियांचा त्यावर परिणाम होतो.
५) भावनिक तणावाच्या परिणामानंतर उपचार होतो. त्यामुळे त्वचारोगाच्या रोगाची प्रक्रिया चालू होते.
६) तणाव व भावनिक दबावांचा सामना करण्यास मदत करते.

उपचाराचा कालावधी

१) जर जखमा कमी प्रमाणात असतील तर त्यांना लगेच आराम मिळेल आणि जर जखमा जास्त प्रमाणात असतील तर त्यांना कमी होण्यास किंवा त्या बर्‍या होण्यास वेळ लागतो.
२) आकार ः- जर जखमां आकाराने लहान असतील तर त्या लवकर कमी होतील आणि जर त्या आकाराने मोठ्या असतील तर त्यांना बरे होण्यास वेळ लागेल.
एकाच प्रकारचे धब्बे लवकर पसरतात. (धब्बे किंवा डाग किंवा ठिपके) दोन्ही बाजूने समान असलेले धब्बे बरे होण्यास वेळ लागतो. ओठांवरील, टोकांवरील, तोंडाच्या कोपर्‍यातील धब्बे किंवा ठिपके बरे होण्यास वेळ लागतो.
बरेच रुग्ण सुरुवातीच्या ४ महिन्यातच सुधारणा दाखवतात आणि त्यांच्या त्वचारोगाचा प्रसार होण्याचे प्रमाण कमी असते.
काय करणे टाळावे?
१) अतिशय आंबट पदार्थ जसे लोणचे, आंबट दही, लिंबू जातीतील फळ.
२) मांसाहारी जेवणे.
३) कृत्रिम रंग जेवणात वापरणे टाळावे.