‘त्या’ भारतीय मच्छिमारांना भारतीय उच्चायुक्त भेटले

0
101
मच्छिमारांची मुले रामनाथपुरम जिल्ह्यात निदर्शने करताना

कोलंबो न्यायालयाकडून मृत्यूदंडाची शिक्षा
अंमली पदार्थ प्रकरणी दोषी ठरल्यावरून कोलंबोमधील न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेल्या ५ भारतीय मच्छिमारांची श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त यश सिन्हा यांनी काल भेट घेतली. सिन्हा यांनी भारत सरकारतर्फे त्यांना पुन्हा भारतात आणण्याचे प्रयत्न करण्याचे आश्‍वासन दिले.सदर ५ भारतीय मच्छिमार कोलंबोतील वेलिकाडा तुरुंगात असून सिन्हा यांनी त्यांची तेथे भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांना कपडे व अन्य साहित्य दिले. अशी माहिती भारताच्या विदेश खात्याचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्ीन यांनी दिली. यावेणी या सर्वांची सुटका करून त्यांना भारतात आणण्यासाठी भारत सरकारतर्फे पुरेपूर प्रयत्न केले जातील असे आश्‍वासन सिन्हा यांनी मच्छिमारांना दिले. इमर्सन, पी. ऑगस्टस, आर. विल्सन, के. प्रसाद व जे. लँगलेट अशी त्यांची नावे असून ते सर्वजण तामिळनाडुतील आहेत. त्यांना २०११ साली कोलंबोत अटक करण्यात आली होती. त्यानंतर तेथील उच्च न्यायालयाने गेल्या ३० ऑक्टोबर रोजी मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली. या निवाड्याचे तामिळनाडूत तीव्र पडसाद उमटले. रामेश्‍वरम येथे हिंसाचाराच्या घटनाही घडल्या.
भारत सरकारतर्फे सध्या कायदेशीर पातळीवर तसेच श्रीलंका सरकारशीही या विषयावर अधिकारी पातळीवर बोलणी चालू असल्याचे सांगण्यात आले. तामिळनाडूतील अभा अद्रमुक व द्रमुक या पक्षांनी केंद्र सरकारकडे या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालण्याची विनंती केली होती.