‘त्या’ पुस्तकाशी संबंध नसल्याचा भाजप माध्यम प्रमुखांचा दावा

0
239

>> ‘आजके शिवाजी नरेंद्र मोदी’वरून वाद

‘आज के शिवाजी – नरेंद्र मोदी’ या पुस्तकाशी भाजपचा कोणताही संबंध नाही. ते एका लेखकाने मांडलेले विचार आहेत. त्या पुस्तकाला नावही जयभगवान गोयल यांनीच दिले आहे असा खुलासा भाजपचे राष्ट्रीय माध्यम सहप्रमुख डॉ. संजय मयुख यांनी केला आहे. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केल्याने देशभरात वाद निर्माण झाला आहे.

या वादामुळे भाजपने या पुस्तकाशी पक्षाचा कोणताही संबंध नाही अशी भूमिका घेतली आहे. भाजप नेते तथा लेखक जयभगवान गोयल यांनी याप्रकरणी क्षमायाचनाही केली आहे. आपण हेतुपूर्वक अशी तुलना केलेली नाही. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असल्यास दिलगीर असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, पक्षाने आदेश दिल्यास पुस्तक मागे घेऊ असे लेखक गोयल यांनी म्हटले आहे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज काम करत असत तसेच नरेंद्र मोदी काम करत असल्याने आपण त्यांचा उल्लेख महाराजांच्या नावे केला असे गोयल यांनी म्हटले आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा आपला हेतू नव्हता असेही ते म्हणाले.