त्या आठ प्रकल्पांना मान्यता हा घोटाळा : अमरनाथ पणजीकर

0
104

पणजी (न. प्र.)
गुंतवणूक प्रोत्साहन मंंडळाने हल्लीच आठ प्रकल्पांना जी मान्यता दिलेली आहे तो एक मोठा घोटाळा असून लांच घेऊन या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली असल्याचा आरोप काल कॉंग्रेस प्रवक्ते अमरनाथ पणजीकर यांनी येथे घेतलेल्या एका पत्रकार परिषदेतून बोलताना केला.
गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाचे अध्यक्ष असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या बैठकीत भाग घेऊन ह्या प्रकल्पांना मान्यता दिल्याचे जे सांगितले जाते ते खोटे असल्याचा आरोपही पणजीकर यांनी यावेळी केला.
गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक दुपारी ३.३० वा. सुरू झाली होती. ती रात्री ८.३० वा.पर्यंत चालू होती. आजारी मुख्यमंत्र्यांनी कित्येक तास चाललेल्या ह्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कसा भाग घेतला, असा प्रश्‍न यावेळी पणजीकर यांनी केला. ते जर खरोखरच व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ह्या बैठकीत सहभागी झाले होते तर व्हिडिओ कॉन्फरसिंग केल्याचे पुरावे सादर करण्यात यावेत, अशी मागणीही पणजीकर यांनी यावेळी केली.