ताळगाव पंचायतीवर एक बिनविरोध

0
133

>> जाहीर प्रचार संपला

>> रविवारी होणार मतदान

ताळगाव पंचायतीच्या येत्या २८ एप्रिल रोजी होणार्‍या निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता शुक्रवार २६ एप्रिल रोजी संध्याकाळी ५ वाजता होणार आहे. या पंचायतीच्या प्रभाग ३ मधून आग्नेलो दा कुन्हा बिनविरोध निवडून आले आहेत. पंचायतीच्या १० प्रभागात २८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात आणि माजी मंत्री बाबूश मोन्सेरात यांच्या ताळगाव प्रोग्रेसिव्ह डेव्हलपमेंट फ्रंटचे ११ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. या गटाचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. मोन्सेरात यांच्या गटाच्या विरोधात निवडणूक रिंगणात असलेल्या काही उमेदवारांना भाजपने पाठिंबा दिला आहे. उमेदवारांनी प्रभागात घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेऊन प्रचार केला आहे.
या पंचायतीच्या पाच प्रभागात दुरंगी, दोन प्रभागात तिरंगी आणि तीन प्रभागात चौरंगी लढत होत आहे.

निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार
प्रभाग १ ः रेहा सुनील पै आणि सिध्दी केरकर ,
प्रभाग २ ः टेरेझिना बार्रेटो, वीरश्री विलास देसाई, अरुणा गिनेश सद्रे,
प्रभाग ४ ः दीपेश गावस, महादेव गोविंद कुंकळ्ळीकर, संदीप दिनेश सांतोडकर, नरेश
नारायण हडकोणकर,
प्रभाग ५ ः सरस्वती मुळगावकर, तनीशा कवळेकर.
प्रभाग ६ ः इस्तेला डिसौझा, हर्षा नाईक,
प्रभाग ७ ः जानू महादेव रूझारियो, आशा दिलीप नार्वेकर.
प्रभाग ८ ः मारिया फर्नांडिस, संजोता गंडोळे.
प्रभाग ९ ः रघुवीर कुंकळ्ळीकर, सचिन खांडोळकर, इम्तियाझ शेख, संजना दिवकर.
प्रभाग १० ः मनिषा महादेव पालेकर, संतोष चोपडेकर, प्रितम शिवदास नाईक,
प्रभाग ११ ः सिडनी बार्रेटो, झेवियर आल्मेदा, सेबस्त्यांव दा कोस्ता, महादेव बाबली पालेकर.