तामिळनाडू, केरळात चक्रीवादळाचे ८ बळी

0
122

ओखी या चक्रीवादळाचा मोठा तडाखा तामिळनाडू व केरळ राज्याच्या किनारपट्टीला बसला आहे. आतापर्यंत या वादळाने ८ जणांचे बळी घेतले आहेत. या चक्रीवादळात झाडे कोसळून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व कर्नाटकात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

ओखी चक्रीवादळाने दुपारनंतर लक्षद्वीप बेटांकडे कूच केले. त्यामुळे दक्षिणेकडील केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. चक्रीवादळामुळे कन्याकुमारी, नागरकोलाई, थिरुअनंतपुरम आणि कोलाम या जिल्ह्यांसह लक्षद्वीपमधील काही भागात मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. थिरुअनंतपुरमधील शाळा आज बंद राहणार आहेत. त्याचबरोबर कन्याकुमारी आणि थिरुअनंतपुरम दरम्यानच्या अनेक प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

हिंद महासागरात अडकलेल्या सहा मच्छीमारांच्या बोटींच्या शोधकार्यासाठी नौदलाची तीन जहाजे व दोन विमाने रवाना झाली आहेत. त्याचबरोबर एक मरीन इंजिनिअरिंग जहाज विझिंजम येथे बेपत्ता झाले आहे. केरळमधील सुमारे ८० मच्छीमार बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. मात्र या वृत्ताला अद्याप दुजोर