तरुणांमध्ये ज्ञानाची तृष्णा असली पाहिजे

0
162
  • नागेश सरदेसाई

गोवा बोर्डाचा १२ वीचा निकाल लागला आणि आता आपले तरुण विद्यार्थी विविध विद्याशाखा जसे कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक विषयात चांगल्या दर्जाचे पदवीशिक्षण घेण्याच्या प्रयत्नात आहेत. जवळपास १६००० विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असल्यामुळे राज्यातील व्यावसायिक तसेच अव्यावसायिक महाविद्यालयांमध्ये जागांसाठी वाढती मागणी आहे.

अनेक कोर्सेस आहेत ज्यांची निवड करता येईल पण अशा काही टीप्स आहेत ज्यामुळे कोणी कोणता कोर्स निवडावा हे ठरवता येईल – म्हणजे ‘‘पॅशन फॉर नॉलेज’’ – ज्ञान मिळविण्याची आवड हा मुख्य गुणधर्म महत्त्वाचा असून मग तुम्ही तुमच्या ‘आवडी’नुसार तुम्ही निवड करायची आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल!!

गोवा बोर्डाचा १२ वीचा निकाल लागला आणि आता आपले तरुण विद्यार्थी विविध विद्याशाखा जसे कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यावसायिक विषयात चांगल्या दर्जाचे पदवीशिक्षण घेण्याच्या प्रयत्नात आहेत. जवळपास १६००० विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असल्यामुळे राज्यातील व्यावसायिक तसेच अव्यावसायिक महाविद्यालयांमध्ये जागांसाठी वाढती मागणी आहे. वाणिज्य प्रवाहामध्ये जास्त वाव आहे. उद्यमशीलतेचं युग असल्यामुळे अनेक रोमांचक कोर्सेस सुरू झालेले आहेत. इंटिग्रेटेड मास्टर ऑफ कॉमर्स हा कोर्स नुकताच एस. एस. डेंपो कॉलेज ऑफ कॉमर्स, कुजिरातर्फे सुरू करण्यात आलेला आहे जो विद्यार्थ्यांना नवी दिशा मिळवून देईल. विविध वाणिज्य महाविद्यालयातील नियमित वाणिज्य विषयातील पदवी कोर्सेसच्या शिवाय विशेष कोर्सेस – फायनान्शियल अकाउंटिंग, ऑडिशन, टॅक्सेशन, बँकिंग, कॉस्टिंग आणि मॅनेजमेंट सुरू झालेले आहेत. तसेच बॅचलर इन बिझिनेस ऍडमिनिस्ट्रेशन (बी.बी.ए.) ज्यासाठी यु.जी.ए.टी. – स्पर्धात्मक परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते, तसेच बॅचलर इन कॉंप्युटर अप्लिकेशन (बी.सी.ए.), बॅचलर ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस (बी.एफ.एस.) हे सगळे कोर्सेस उद्योगाचे वातावरण निर्माण करण्यास उपयोगी आहेत. याशिवाय असे करिअर्स जे चार्टर्ड अकाउंटंट्‌स, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटंट, कंपनी सेक्रेटरी होण्यास इच्छुक विद्यार्थ्यांना एक परीक्षा सी.पी.टी.- कॉमन प्रोफिशिएन्सी टेस्ट – (फाउंडेशन कोर्स) द्यावी लागते. दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्‌स ऑफ इंडियाची एक शाखा गोव्यात सुरू झाली असून ती पणजीमध्ये कामत टॉवर्स-पाट्टो येथे आहे ज्या ठिकाणी आपल्याला अधिक माहिती मिळू शकेल. हे व्यावसायिक कॉमर्समधील कोर्सेस कला, विज्ञान आणि व्यावसायिक प्रवाहातील विद्यार्थ्यांनासुद्धा करता येतात. शिवाय इतर अनेक कोर्सेस जसे लॉ प्रोग्राम, हॉटेल मॅनेजमेंट यांकरिता ऑल इंडिया एन्ट्रन्स एक्झामिनेशन आहे जी व्यावसायिक पद्धतीवर घेतली जाते. या प्रवेश परीक्षांसाठी ३ ते ४ महिने आधी अर्ज भरावा लागतो जेणेकरून विद्यार्थ्यांना स्पर्धेत उतरण्याची जय्यत तयारी करण्यास वेळ मिळावा. या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांना फायनान्शियल अकाउंटिंग आणि गणितामध्ये वाक्‌पटुता (फ्लुएन्सी) असायला पाहिजे त्याचबरोबर इकॉनॉमिक्स (अर्थशास्त्र) आणि लॉजिकल रिझनिंगचे उत्तम ज्ञान असायला पाहिजे. नॅशनलाईज्ड आणि इतर कमर्शियल बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर्सच्या जागांवर नोकरी मिळविण्यासाठी स्पर्धात्मक परीक्षा असतात. ऍग्रीकल्चरल ऑफिसरला त्याच्या विषयाचे सखोल ज्ञान असले पाहिजे. ‘लॉ प्रोग्राम’मध्ये सोशल सायन्सेस, लॉ आणि कमर्शियल विषयांचा समुच्चय असतो. ३ वर्षे किंवा ५ वर्षे लॉ प्रोग्रामकरता विद्यार्थ्याला खूप मेहनत घ्यावी लागते. १२वी पर्यंत मॅथ्स म्हणजे गणित विषय असणे हे नंतर कॉमर्स विषयाकडे जाणार्‍या विद्यार्थ्यांकरताही अत्यंत आवश्यक आहे कारण त्यामुळे प्रत्येक स्पर्धात्मक परीक्षा देणे त्यांना सहज सोपे जाते. कॉमर्सचे शिक्षण घेतलेला उमेदवार हायर सेकंडरी कॉलेज किंवा विद्यापीठ पातळीवर शिकवू शकतो. कॉमर्समध्ये मास्टर डिग्री व त्यासोबत बी.एड.ची पदवी किंवा नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट (एन्.ई.टी.) उत्तीर्ण केल्यास उमेदवार अध्यापक किंवा शिक्षक बनू शकतो. ह्युमॅनाईट्‌सच्या प्रवाहात (आर्ट), जर्नालिझम (पत्रकारिता), टिचिंग (शिक्षक), हॉटेल मॅनेजमेंट, इव्हेंट मॅनेजमेंट हे कोर्सेस लोकप्रिय आहेत. गोव्यातील अनेक कॉलेजांमध्ये बी. जर्नालिझमचा कोर्स उपलब्ध आहे. लिहिण्याची आवड असेल तर समविचारी लोकांसाठी एक नवे दालन उघडले जाते जसे काल्पनिक गोष्टी, अर्थशास्त्रीय पत्रकारिता, विज्ञान पत्रकारिता इत्यादी.

शिक्षक होण्यासाठी एकाला इंटिग्रेटेड बी.ए.बी.एड. हा ४ वर्षांचा कोर्स करता येतो ज्यानंतर तो सेकंडरी शाळेत शिक्षक होऊ शकतो. १२ वीनंतर पत्रकारितेत डिप्लोमा (डिएड) केले तर तो प्राथमिक व त्याआधीच्या वर्गांना शिकवू शकतो. हायर सेकंडरीला शिकविण्यासाठी मास्टर डिग्री आणि बी.एड. केले तर पुरेसे असते पण मास्टर्स डिग्री बी-प्लस ग्रेड असेल आणि एन.ई.टी. किंवा एस्.ई.टी. या परीक्षा दिल्या तर कॉलेज किंवा विद्यापीठ पातळीवर असिस्टंट प्रोफेसर होता येते. शिक्षण क्षेत्रात फिजिकल एज्युकेशन, फाइन आर्टस्, ड्राईंगसाठी विद्यार्थ्यांने बी.पी.एड. डिग्री कोर्स करायला पाहिजे किंवा बीएफ्‌ए – बॅचलर ऑफ फाईन आर्टस् केलेला उमेदवार ड्राईंग शिक्षक होऊ शकतो.

लायब्ररियन किंवा ग्रंथपाल हा कोणत्याही शैक्षणिक संस्थेचा मुख्य आधार समजल्या जातो. कुठल्याही प्रवाहातील- विज्ञान, कला किंवा वाणिज्य शाखेतील पदवी प्राप्त केल्यानंतर बी.लिब.सायन्स. कोर्स करता येतो. गोव्यात होणार्‍या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमुळे जसे ईफ्फी, समिट मिटिंग, स्पोर्ट इव्हेंट्‌स किंवा इतर इव्हेंट मॅनेजमेंट कोर्सलाही खूप महत्त्व प्राप्त झाले आहे व हा कोर्सही कुठल्याही प्रवाहातील पदवी प्राप्त केल्यानंतर करता येतो.
इतिहास विषयात विशेष कोर्सेस आहेत – जसे ऑर्किऑलॉजी, ऑर्चिव्हल स्टडीज, मस्कॉलॉजी, न्यमिसमॅटिस, एपिग्राफी इत्यादी जे दिल्ली, मुंबई आणि बंगरुळू येथे उपलब्ध आहेत. गोव्यात मात्र यासाठी एकही संस्था नाही.
‘होमसायन्स’मध्ये सुद्धा उत्तम करिअर करता येते. यामध्ये होमसायन्सच्या विविध शाखांमध्ये डिग्री कोर्स – डायटेटिक्स, न्युट्रीशन, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि गारमेंट टेक्नॉलॉजी केल्यास तरुणांना चांगले कार्यक्षेत्र मिळू शकते. संगीत क्षेत्रात आवड असेल तर व्यावसायिक बी.म्युझिक कोर्सेस केले तर तरुणाचे जीवन बदलू शकते. विविध घराण्यांचा अभ्यास हा तबला, गायन, हार्मोनियम आणि इतर वाद्ये शिकल्यास गोव्यात करता येऊ शकतो.

विज्ञानाचे क्षेत्र हे क्रियाप्रवण, नाविण्यपूर्ण आणि विलक्षण क्षेत्र आहे. शुद्ध विज्ञान विषयातील पदवी म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स आणि अप्लाईड सायन्समध्ये बॉटनी, झुऑलॉजी, जिऑलॉजी, मायक्रोबायॉलॉजी यासोबतच जर संशोधनाचे ज्ञान असेल तर लाभदायक असते.
इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीचे क्षेत्र आज एक उद्योग बनले आहे ज्यामध्ये भरपूर जागा असलेले इंजिनिअरिंग कॉलेजेस आपल्या देशात खाजगी क्षेत्रात भरपूर आहेत आणि चांगल्या विषयाची निवड केली तर चांगले यशस्वी करिअर करता येऊ शकते. द प्रेस्टिजियस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज (आय.आय.टी.ज) मध्ये ते त्यांच्या स्वतःच्या मार्गाने उमेदवार निवडतात. त्यांची मुख्य प्रवेश परीक्षा म्हणजे आयआयटी-जेईई (मेन्स). यानंतर ऍडव्हान्स परीक्षा असते. मेन्स परीक्षेचा उपयोग विविध नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज (एन.आय.टी.ज) संपूर्ण देशभरात करून घेतात जसे एन.आय.टी.-गोवामध्ये गोव्यातील विद्यार्थ्यांकरिता ४०% जागा आरक्षित आहेत. इतर सर्वोत्तम इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्‌समध्ये बिट्‌स-पिलानी (गोवा कॅम्पस) ज्यामध्ये पदवीपूर्व कोर्स म्हणजे बी.टेक. करण्यासाठी प्रतिष्ठित ऑनलाईन बी.आय.टी.एस.ए.टी (बिट-सॅट) परीक्षा द्यावी लागते.

मेडिसीन आणि इतर समवर्गी विषयांकरिता देशात आज कॉमन परीक्षा ज्याला एन.ई.ई.टी.- नीट – नॅशनल एलिजिबल एन्ट्रन्स एक्झाम द्यावी लागते ज्याद्वारे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये दाखला मिळतो. देशातील प्रत्येक राज्यातील डेंटल कॉलेजमध्ये राज्याकरता जागा (कोटा) आरक्षित असतात. याशिवाय आयुर्वेदिक आणि होमिओपॅथीसाठी यातूनच जागा भरल्या जातात. समवर्गी म्हणजेच अलाइड मेडिकल कोर्सेस (एएमसीज) – जसे ऑप्टोमेट्री, फिजिऑलॉजी, लॅब टेक्निशियन या जागासुद्धा चार वर्षांच्या नर्सिंगच्या डिग्री कोर्ससोबतच भरल्या जातात.
द गोवा कॉमन एन्ट्रन्स टेस्ट – जीसीईटी परीक्षा जी गोव्यातील सरकारी व खाजगी इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी घेतली जाते (५) आणि गोवा कॉलेज ऑफ फार्मसीसुद्धा. नुकतेच ऍग्रीकल्चर क्षेत्र केपे येथे सुरू करण्यात आले असून येथे बीएससी-ऍग्री. कोर्ससाठी १२ वी सायन्सच्या गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो. शिवाय महाराष्ट्रातही ऍग्रीकल्चर कॉलेजमध्ये गोव्यातील विद्यार्थ्यांकरता काही जागा आरक्षित केल्या आहेत. फिशरीज एज्युकेशनसाठीही महाराष्ट्र, केरळमध्ये जागा आरक्षित असून त्यासंबंधी सविस्तर माहिती डायरेक्टोरेट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट येथे मिळेल. बॅचलर्स डिग्री प्रोग्राम इन बायोटेक्नॉलॉजी – ज्यात जेनेटिक्स, जेनॉम मॅपिंग आणि इतर बायोलॉजिकल टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात भरपूर संधी आहेत त्या या कोर्सद्वारे उपलब्ध होतात. विज्ञानाच्या विद्यार्थ्यांकरिता बी.एससी.-इन कॉम्प्युटर सायन्स उपलब्ध आहे जे १२ वीच्या गुणवत्तेनुसार करता येऊ शकते. बी.एससी. डिग्रीसुद्धा गोव्यातील १० सायन्स कॉलेजेसमध्ये उपलब्ध आहे ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, जिऑलॉजी, मायक्रोबायॉलॉजी, बॉटनी, झुऑलॉजी, मॅथ्स, ज्यामध्ये पुढे संशोधनही करता येते.

नुकतेच नोबेल प्राइज सिरीज सेमिनार्स आणि कला अकादमी येथील प्रदर्शनात गोव्यातील विद्यार्थ्यांकडून प्रभावी प्रतिसाद मिळालेला दिसून आला आणि त्यामुळे त्यांना जास्त मिळकतीच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट जसे रिसर्च लेबॉरेटरीज, इंडियन इनस्टिट्यूट ऑफ सायन्स-बंगळुरू, आणि जवळजवळ ४० लॅब्ज ऑफ सेंटर फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्च (सीएसआयआर) मध्ये नोकरीच्या संधी मिळू शकतात. सायन्सचे विद्याथी ११वी आणि १२वी करताना किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना परीक्षा देऊ शकतात ज्यामुळे त्यांची निवड सर्वोत्तम अशा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, एज्युकेशन अँड रिसर्च – आय.आय.एस.इ.आर. मध्ये होऊ शकते व त्यांना नवीन काही करण्याची संधी मिळू शकते. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटद्वारे नुकताच एक कार्यक्रम लॉंच करण्यात आला ज्याच्या द्वारे राज्यातील हजारो इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना विविध ऍप्स तयार करायच्या असून त्या कॉमन फूड आणि पब्लिकच्या उपयोगाकरता असतील. हे एक योग्य पाऊल असून याद्वारे आपल्या देशात संशोधनाला प्रोत्साहन दिले जाईल.

मेक-इन-इंडिया कार्यक्रमाद्वारे ऍग्रीकल्चर, स्किल डेव्हलपमेंट, उद्योग-व्यवसाय, डिफेन्स इनिशिएटिव्हज् आणि अनेक इतर कोर्सेसमध्ये तरुणांसाठी लाभदायक सिद्ध होईल. डिग्री करिअर्सकरता सायन्सचे विद्यार्थी युनिअन पब्लिक सर्व्हिस कमिशन – युपीएससी परीक्षा, नॅशनल डिफेन्स सर्व्हिस – एन्‌डीए परीक्षा जी वर्षातून दोन वेळा घेण्यात येते ती देऊ शकतात आणि त्याद्वारे डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये ऑफिसरच्या जागांसाठी उमेदवार निवडले जातात. ए-प्लस-२ इन सायन्स (फिजिक्स आणि मॅथ्स) तसेच ऍप्टिट्यूड इन जनरल अवेअरनेस असलेल्या साडेसोळा ते एकोणवीस वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना डिफेन्स फोर्सेसमध्ये सरळ प्रवेश मिळवता येतो. एनडीए परीक्षेकरिता मॅथेमॅटिक्स सोबत इंग्रजी, जनरल स्टडीज आणि लॉजिकल अँड न्युमरिकल ऍप्टिट्यूड कॅपॅबिलिटीज गरजेच्या असतात. सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात भरपूर संधी असून नवीन क्षेत्र आहे ते म्हणजे स्टॅटिस्टिक्स. बीएससी-स्टॅटिस्टिक्स हे आयआयटीमध्ये आणि काही प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये आयआयटी-जेईई परीक्षेद्वारे मिळते.

मरीन इंजिनिअरिंग मुंबईमध्ये किंवा चेन्नईमध्ये १२ वी सायन्सनंतर विद्यार्थी मर्चंट नेव्हीमध्ये प्रवेश मिळवू शकतात. कमर्शियल पायलट होण्यासाठी विद्यार्थ्याला उत्तर प्रदेशात उपलब्ध असलेले शैक्षणिक प्रशिक्षण घेऊन लायसन्स मिळवावे लागते. दिव्यांग मुलांसाठीसुद्धा गोव्यामध्ये आज अनेक विशेष शाळा सुरू झालेल्या दिसून येत आहेत. या विशेष मुलांना शिकविण्यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी कोणत्याही पदवीनंतर विशेष बी.एड. कोर्स उपलब्ध आहे.

‘समाज कार्य’ किंवा सोशल वर्क ही आज काळाची गरज असून त्यात बी.एसडब्लू. कोर्स डॉन बॉस्को कॉलेज, पणजी येथे आहे आणि कोणत्याही एनजीओमध्ये काम करण्याचा आनंद आव्हानात्मक व रोमांचक असतो. ग्लॅमर आणि न्यूजच्या जगामध्ये मास मिडियामधील करिअर हे उत्साहपूर्ण विद्यार्थ्यांसाठी बक्षिसपात्र ठरू शकतं. या सोशल मिडियामध्ये आज विविध ऑडिओ-व्हिज्युअल उपकरणे आलेली आहेत ज्यामुळे त्यातील करिअर आज तरुणांना फार पुढे घेऊन जाईल.
१२ वीनंतर व्यावसायिक कोर्सेसमध्ये – इन्श्युरन्स कोर्स, ऑटोमोबाइल इंडिनिअरिंग कोर्सेस, हॉर्टिकल्चर आणि फ्लॉरीकल्चर कोर्स, फॅशन डिझायनर्स कोर्सेस हे पदवी पातळीवरील आहेत. बी-व्होक. – बॅचलर ऑफ व्होकेशनल प्रोग्रॅम हा यावर्षी सुरू करण्यात येणार असून अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. शिपिंग मॅनेजमेंट कोर्सेस सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जहाज वाहतुकीच्या क्षेत्रात उद्योग करण्यास भरपूर वाव मिळत आहे.

पण प्रिय मित्रांनो, येथे अनेक कोर्सेस आहेत ज्यांची निवड करता येईल पण अशा काही टीप्स आहेत ज्यामुळे कोणी कोणता कोर्स निवडावा हे ठरवता येईल – म्हणजे ‘‘पॅशन फॉर नॉलेज’’ – ज्ञान मिळविण्याची आवड हा मुख्य गुणधर्म महत्त्वाचा असून मग तुम्ही तुमच्या ‘आवडी’नुसार तुम्ही निवड करायची आणि तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. ‘क्रेव्हिंग फॉर एक्सेलन्स’ हा एक यशस्वी माणूस बनण्याचा तुमचा मंत्र असला पाहिजे.