तरुणांना विज्ञानाची आवड लावण्यासाठी देशी भाषा वापर

0
145

>> पंतप्रधान मोदी यांचे शास्त्रज्ञांना आवाहन

तरुणांच्या मनात विज्ञान व तंत्रज्ञान याविषयी आवड निर्माण करण्यासाठी देशातील संशोधकांनी देशी भाषांचा वापर करावा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. येथे आयोजित प्रा. सत्येंद्रनाथ बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्तच्या कार्यक्रमात मोदी बोलत होते.

प्रादेशिक भाषेत विज्ञान विषय शिकवण्याच्या कार्यात प्रा. बोस यांचे योगदान मोठे आहे. त्यांनी विज्ञानाच्या प्रसारासाठी ‘ग्यान ओ बिग्यान’ हे बंगाली नियतकालिक सुरू केले होते. विद्यार्थ्यांना विज्ञानविषयक गोष्टींचे सहजतेने आकलन होण्याचा त्यामागे हेतू होता. आपल्याकडे वर्तमान स्थितीत विज्ञानाविषयी मोठ्या प्रमाणावर चर्चा घडवून आणणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच भाषा हा अडथळा न ठरता माहितीचे माध्यम व्हायला हवे असे मत मोदी यांनी आपल्या भाषणात मांडले.

वैज्ञानिक यश आणि शोध हे प्रयोग शाळांपुरतेच मर्यादित राहिले तर तो सामान्य लोकांवर अन्याय ठरेल. त्यामुळे वैज्ञानिक शोध जेव्हा सामान्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील तेव्हाच शास्त्रज्ञांच्या मेहनतीचे खर्‍या अर्थाने सार्थक होईल.