ड्रग्स माफियांवर कारवाईसाठी पत्रकार, नागरिकांचे सहकार्य हवे

0
133

>> मटका देशभरात चालतो ः आजगावकर

गोव्यातील अमली पदार्थांचा व्यवहार हा एक गंभीर विषय असून अमली पदार्थ माफियांवर कारवाई करण्यासाठी सरकारला पोलीस, पत्रकार व गोव्यातील जनतेचे सहकार्य हवे आहे, असे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. विरोधकांनी कोणता मंत्री ड्रग्स माफियांना सहकार्य करतो ते सांगण्याचे आव्हान देतानाच मटका संपूर्ण देशात चालत असल्याचा दावाही त्यांनी केला.

राज्यात जो अमली पदार्थांचा व्यवहार चालू आहे त्याविषयी सरकारला चिंता आहे. अमली पदार्थांचा व्यवहार करणार्‍या माफियांचे कंबरडे मोडण्यासाठी सरकारला पत्रकार व लोकांचे सहकार्य हवे आहे. कुठे कुठे हा व्यवहार चालू आहे ते वरील घटकांनी सरकारला दाखवून द्यावे. तसेच पोलिसांनी सक्रीय व्हावे व या लोकांवर कारवाई करावी, असे आजगावकर म्हणाले.
आमदार बनल्यापासून आपण अमली पदार्थ व्यवहाराविषयी आवाज उठवीत आलो असल्याचे आजगावकर म्हणाले. विरोधकांनी सरकारवर खोटे आरोप करू नयेत. कुठला मंत्री ड्रग माफियांना सहकार्य करीत आहे ते विरोधकांनी नाव घेऊन सांगावे, असे आव्हानही त्यांनी यावेळी दिले.