डॉ. मनमोहनांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ काश्मीरात

0
83

>> कॉंग्रेसकडून शांततेसाठी प्रयत्न

जम्मू – काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापनेसाठी कॉंग्रेसकडून काही धोरणे आखण्यात आली आहेत. या धोरणांच्या अंमलबजावणीसाठी माजी पंतप्रधान तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ काल जम्मूत दाखल झाले. राज्यातील विविध राजकीय नेते तसेच स्थानिक नागरिकांशी हे शिष्टमंडळ चर्चा करणार आहे.
या शिष्टमंडळात माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम, गुलाम नबी आझाद, अंबिका सोनी, करण सिंग यांचा समावेश आहे. जम्मूत दाखल झाल्यानंतर या शिष्टमंडळाने राज्यातील कॉंग्रेसच्या आमदारांची भेट घेतली. हे शिष्टमंडळ आता २५ नेत्यांची भेट घेणार आहे. तसेच जम्मू बार असोसिएशनचे सदस्य, चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रिजचे सदस्य, विस्थापित झालेले काश्मिरी पंडीत तसेच पश्‍चिम पाकिस्तानातील निर्वासितांनाही ते भेटणार आहेत.
या शिष्टमंडळाच्या भेटीमुळे सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.