डॉप्लर यंत्रणा कार्यरत करणे लांबणीवर

0
94

हवामानाचा वेध घेऊन अचूकपणे संदेश देण्याची आधुनिक यंत्रणा असलेले डॉप्लर कार्यरत करणे काही तांत्रिक कारणामुळे लांबणीवर पडले आहे. डॉप्लर कार्यरत करण्यासाठी केंद्रीय हवामान खात्याचे सचिव गोव्यात येणार होते. काही अडचणींमुळे त्यांची गोवा भेट लांबणीवर पडली आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे उद्घाटन लांबणीवर पडल्याचे सांगण्यात आले.
सुमारे २५ कोटी रुपये खर्चाची ही आधुनिक यंत्रणा आल्तिनो येथे उभारण्यात आली आहे. डॉप्लरच्या माध्यमातून त्सुनामी, वादळ, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तींची चाहूल लागू शकेल. वरील यंत्रणा पाचशे किलोमीटर भागातील हवामानाचा वेध घेऊ शकेल. त्यामुळे कोणत्याही संकटाच्या वेळी आपत्‌कालीन यंत्रणेला सतर्क राहणे सोपे होणार असल्याने डॉप्लरला बरेच महत्त्व आहे. डॉप्लरच्या माध्यमातून वेळोवेळी हवामानाची माहिती मिळेल.