डॉक्टर, आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ला हा अजामीनपत्र गुन्हा —

0
150

>> केंद्रिय मंत्री जावडेकर यांचा इशारा

 

यापुढे डॉक्टरांवर, आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ले झाल्यास तो अजामीनपात्र गुन्हा असेल अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मोदी सरकारने नवा अध्यादेश काढला आहे. त्यामध्ये दोन लाख रुपयापर्यंतच्या दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे असेही श्री. जावडेकर यांनी स्पष्ट केले. या अध्यादेशाला राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या कोरोनाच्या लढाईत डॉक्टर, नर्सेस, आरोग्य कर्मचारी हे सतत धडपडत आहेत. मात्र त्यांच्याविरोधात हिंसा करण्याचे, त्यांना हीन वागणूक देण्याचे प्रकार देशात घडत आहेत. यापुढे हे मुळीच सहन केले जाणार नाही. याचसाठी केंद्र सरकारने अध्यादेश काढला आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी यांच्यावर हल्ला केल्यास अजामीनपात्र गुन्हा दाखल होईल. तसेच तीन महिने ते पाच वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद असेल आणि ५० हजार ते २ लाखापर्यंतचा दंडही वसूल करण्यात येईल असे जावडेकर यांनी स्पष्ट केले.