डॉक्टरऐवजी सॉफ्टवेअर

0
147

नवे वर्ष सुरू होऊन पाहता पाहता दोन महिने उलटले. तरीही गेल्या वर्षात काय घडले आणि नवीन वर्षात काय घडणार ह्याबाबतची चर्चा आणखी काही काळ चालू राहीलच. तांत्रिक प्रगतीच्या संदर्भात, ङ्गक्त २०१५ मध्येच नाही तर, एकंदरीत नजीकच्या भविष्यात – म्हणजे येत्या दशकात – काय घडू शकेल ह्याचा अंदाज घेण्याच्या प्रयत्नांकडे आपण एक नजर टाकू. अर्थात ‘तांत्रिक प्रगती’ हा ङ्गारच सर्वसमावेशक शब्दप्रयोग असल्याने तूर्त एका विशिष्ट क्षेत्राच्या काही भागाचाच आपण विचार करू. विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती, विशेषतः गेल्या दोनएक दशकांत, चक्रावणार्‍या वेगाने झाली असून त्याच्या प्रभावाखाली नसलेले क्षेत्र आता खरोखरीज दुर्मिळ झाले आहे! ह्या प्रसाराच्या सामाजिक परिणामांचा अभ्यास करणार्‍यांना असे वाटते की ह्यामुळे एक नवीनच दरी निर्माण होणार आहे आणि तिचे प्रतिबिंब उच्च कार्यकुशलता (हाय स्किल्स) आणि कमी कार्यकुशलता (लो स्किल्स) असलेल्या व्यक्तीना मिळणार्‍या रोजगाराच्या स्वरूपात दिसणार आहे. नव्या जगातील मुख्य आर्थिक लाभांचा मोठा वाटा ‘हायली स्किल्ड्’ लोकांकडे जाऊन ‘लो स्किल्स’ वाल्यांना चटणीभाकरीवरच आयुष्य काढावे लागेल असे काहीसे चित्र दिसण्याची शक्यता आहे. (या विषयावर टायलर कोवेन ह्या प्रसिद्ध अर्थतज्ज्ञाने ‘ऍव्हरेज इज ओव्हर’ (र्ईंशीरसश ळी र्जींशी) नामक पुस्तकही लिहिलेले आहे.परंतु असे काहीही होणार नसून उच्च कार्यकुशलता असणार्‍यांचीही अवस्था तितकीच बिकट होणार आहे असाही एक मतप्रवाह आहे. आणि हायली स्किल्ड व्यक्तींची संख्या वा उपलब्धता रोडावल्याने लो स्किल्ड वर्कर्सना बरे दिवस येतील असे ह्या संकल्पनेच्या समर्थकांना वाटते! वर सांगितल्याप्रमाणे आपण ह्या संदर्भात एका विशिष्ट तंत्रशाखेचा विचार करणार आहोत – वैद्यकशास्त्र. आता कोणी म्हणेल ‘डॉक्टरकीला काय धाड झाली आहे?! डॉक्टर होण्यासाठी उच्च बुद्धिमत्ता आणि किमान ६ ते १० वर्षे कठोर मेहनत करण्याची तर गरज असतेच. शिवाय डॉक्टरांना भरपूर मानसन्मान आणि पैसा मिळतो…’ परंतु हे चित्र येत्या दशकानंतर बदलायला सुरूवात होणार आहे आणि त्याला कारणीभूत ठरणार आहेत विविध सॉफ्टवेअर्स!
होय – संगणक, सॉफ्टवेअर्स, ऍप्स, स्मार्टङ्गोन्स…अनेकविध अभ्यासांतून आणि सर्वेक्षणांतून स्पष्टपणे दिसले आहे की आजाराचे निदान करण्याची संगणकीय क्षमता – पारंपारिक मानवी डॉक्टरांपेक्षा – जास्त चांगली आहे आणि ह्या रोगनिदानातील संभाव्य चुकांचे प्रमाण तितकेच कमी आहे!! ह्याला ‘एव्हिडन्स-बेस्ड् डायग्नॉसिस’ असे नाव आहे. अर्थात डॉक्टरांना हा प्रकार अजिबात रुचलेला नाही कारण यंत्राची विश्‍लेषणक्षमता आपल्यापेक्षा चांगली आणि अचूक असणे बर्‍याच मानवांना पटत नाही, शिवाय (निदान काही प्रकरणांमध्ये तरी) मानवी चुका उघड होण्याची शक्यता आहे! ‘…मला माहीत आहे मी काय करत आहे, यंत्राने शिकवण्याची गरज नाही!’ ही भावना मनात असलेल्या डॉक्टरांना बदलत्या परिस्थितीला सामोरे जाणे कठीण वाटणार यात शंकाच नाही.
अशा प्रकारची सॉफ्टवेअर्स आणि ऍप्स पुरवणार्‍या कंपन्यांची संख्या सध्या जरा मर्यादित असली तरी येत्या दशकात ती झपाट्‌याने वाढेल हे नक्की. थेरानो (ढहशीरपेी), शेर्पा (डहशीरिर) ह्यांसारख्या कंपन्या सध्या या क्षेत्रातील महत्त्वाच्या मानल्या जातात. ‘थेरानो’द्वारे केली जाणारी रक्तचाचणी (ब्लड टेस्ट) स्वस्त तर पडतेच शिवाय तीमधून, पारंपारिक पद्धतींपेक्षा, जास्त माहिती कमी वेळात मिळते. तर ‘शेर्पा’ हे मोबाइल ऍप असून त्याद्वारे रोगनिदानाबरोबरच संबंधित विशेषज्ञांची नावे सांगणे, प्रिस्क्रिप्शन समजावून देणे, पर्यायी औषधे सुचवणे अशीही कामे केली जातात. एखाद्या उपचारपद्धतीमुळे रुग्णाच्या वैद्यकीय विम्यावर होणारा संभाव्य परिणामही कळू शकतो असे ऍपच्या निर्मात्यांचे म्हणणे आहे! हे ऍप सध्या डॉक्टरांच्या सहकार्याने वापरले जात असले तरी लवकरच त्याची स्वतंत्र आवृत्ती येणार आहे.
संगणकाकडून स्पर्धा होण्याचा (आणि पर्यायाने स्वतःची कमाई घटण्याचा) हा धोका सर्वाधिक प्रमाणात आहे तो अमेरिकन डॉक्टर्सना! अमेरिकन डॉक्टर्स जगातील सर्वात महागडे गणले जातात!! त्यामानाने अगदीच वाजवी ङ्गी घेणार्‍या भारतीय तसेच इतर आशियाई वंशाच्या डॉक्टरांना ह्या इलेक्ट्रॉनिक हस्तक्षेपाची विशेष पर्वा नाही. ह्यामागे आणखीही एक मानववंशीय-समाजशास्त्रीय कारण आहे – अमेरिका आणि इतर काही देश सोडले तर जगाची ऊर्वरित लोकसंख्या यंत्रणांवर अवाजवी विश्वास ठेवून मानवी विचार, संवाद/स्पर्श आणि श्रमांना तुच्छ लेखणार्‍यातली नाही! विविध ‘पॅथीं’वर श्रद्धा असणारा आणि ‘जीपी’ उर्ङ्ग जनरल प्रॅक्टिशनरचा सल्ला मानणारा मोठा वर्ग आजही अस्तित्वात आहे.
खरे तर ह्या नवतंत्रज्ञानाचा ङ्गायदा कुशलतेच्या मध्यम पातळीवर असलेल्या कर्मचार्‍यांना होणार आहे, आणि पर्यायाने रुग्णांना. हे तंत्र वापरून परिचारिका आणि प्रयोगशालेय व्यक्ती म्हणजेच ‘पॅरामेडिकल स्टाङ्ग’ अधिक कार्यक्षमतेने आणि कमी खर्चात काम करू शकणार आहे. प्रकृतीच्या किरकोळ तक्रारींचे निदान करून औषधे सुचवण्याचे मूलभूत काम तर ही सॉफ्टवेअर्स नक्कीच करू शकतील. त्यांना पॅरामेडिकल स्टाङ्गची साथ मिळाल्याने रुग्णांच्या तुलनेने छोट्या समस्या चटकन आणि किङ्गायतशीर दरात सुटण्याची शक्यता वाढेल. ही सॉफ्टवेअर्सही विशेषज्ञांची नावे पुरवतीलच तेव्हा रुग्णाची तब्येत गंभीररीत्या ढासळू लागताच पुढील हालचाली करता येतील. डॉक्टरांचे मत ‘व्हर्चुअल’ मार्गाने मिळवता येईलच. मुख्य म्हणजे ह्यातील बर्‍याचश्या सेवासुविधा मिळवण्यासाठी रुग्णाला स्वतःचे घर सोडून दवाखान्यात जावे लागणार नाही! ह्यामुळे गैरसोय कमी होऊन प्रत्यक्ष औषधोपचारासाठी जास्त वेळ मिळेल, कारण आज आपण पाहतो की रुग्णाचा बराचसा वेळ डॉक्टरांची भेट मिळवण्यासाठी आणि जाण्यायेण्यातच खर्च होतो, त्यामध्ये प्रत्यक्ष उत्पादक काम काहीच साधत नाही!!
नवतंत्रज्ञानाच्या प्रसारामुळे येत्या दशकात वैद्यकीय उपचारांच्या क्षेत्रातही मोठे बदल होण्याची शक्यता दिसू लागली आहे. परिणामी कार्यकुशलतेच्या खालच्या पातळीवर असलेल्यांना वर चढण्याची संधीही यातून मिळणार आहे.