डेन्मार्कमधील हवामान परिषदेसाठी केजरीवालांना परवानगी नाकारली

0
139

डेन्मार्क येथे होणार्‍या सी-४० हवामानबदल विषयक परिषदेस उपस्थित राहण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना राजकीय मान्यता केंद्रीय विदेश व्यवहार मंत्रालयाने नाकारली आहे. केजरीवाल यांच्याऐवजी प. बंगालचे मंत्री फिरहाद हकीम यांना मान्यता देण्यात आली आहे.

दिल्ली सरकारच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल काल मंगळवारी दु. २ वा. वरील परिषदेस उपस्थित राहण्यासाठी रवाना होणार होते. परंतु त्यांना विदेश व्यवहार मंत्रालयाने राजकीय परवानगी नाकारल्याने ते डेन्मार्कला जाऊ शकले नाही. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांनी केंद्राच्या या निर्णयाला दुर्दैवी असे संबोधले आहे. या निर्णयामुळे भारताच्या प्रतिमेवर परिणाम होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ‘आप’च्या सरकारवर केंद्र सरकारचा एवढा राग का असा सवालही त्यांनी केला.

डेन्मार्कमधील सदर परिषद ९ ते १२ ऑक्टोबर दरम्यान होणार असून त्यासाठी अरविंद केजरीवाल आठ सदस्यीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार होते.