डिसेंबरपर्यंत राज्याचे प्रशासन अधिक सक्रीय : पर्रीकर

0
99

आपल्या सरकारने परवा मंगळवारी अडीच वर्षे पूर्ण केली. पत्रकारांसह सर्व घटकांच्या मदतीने या काळात कोलमडलेले प्रशासन सावरण्याचे बरेचसे काम झाले आहे. येत्या डिसेंबरपर्यंत ते अधिक सक्रीय होऊ शकेल, असा विश्‍वास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्त केला.
खाण बंदीमुळे सरकारला ३००० कोटींचे नुकसान सोसावे लागले. अशा परिस्थितीही सरकारने जनतेला दिलेली जास्तीत जास्त आश्‍वासने पूर्ण करण्याचे काम केले. राज्यात आता आर्थिक प्रगती झाली आहे. ऑगस्ट अखेरपर्यंत २५ टक्के अतिरिक्त महसूल गोळा झाला. खाण व्यवसाय सुरू झाल्यानंतर हे प्रमाण वाढेल, असे पर्रीकर यांनी सांगितले. पुरामुळे काश्मीरची स्थिती गंभीर बनली आहे. गोवा सरकारही मदत करेल. यासंबंधीचा निर्णय येत्या बुधवारी होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.