डिझेल दर उतरवा किंवा १४ रु. दर द्या

0
111

>> खाण ट्रकमालकांची सावर्डे बैठकीत ठाम मागणी

सरकारने निश्‍चित केलेला खनिज वाहतूक दर डिझेल दरामुळे परवडणार नसल्याने डिझेलचा दर उतरवला तरच परवडण्यासारखा आहे. म्हणून सरकारने या समस्येवर तोडगा काढणे महत्त्वाचे आहे.

एक तर डिझेलचा दर कमी करा किंवा १४ रुपये दर निश्‍चित करा या मागणीवर ट्रकमालक ठाम आहेत असा पवित्रा कालच्या बैठकीत घेण्यात आला. सोमवारपासून पोलीस संरक्षणात खनिज वाहतूक सुरू करण्यात येणार असल्याने व दराबाबत ट्रकमालक खूश नसल्याने सावर्डे येथे ट्रकमालकांनी बैठक घेतली होती. यावेळी समस्त लोकांचे मत विचारात घेण्यात आले. या वेळेत दरवाढ किंवा डिझेल दर उतरणे. या दोन गोष्टीवर आम्ही ठाम असल्याचे उपस्थित ट्रक मालकांनी सांगितले.
या बैठकीत सर्व कंपन्यांशी बोलणी करावी व ट्रकमालकांच्या समस्या मांडाव्यात तसेच सोमवारपूर्वी तोडगा काढावा असे विचार मांडण्यात आले.

आताच्या दराने वाहतूक करण्यापेक्षा आपले ट्रक बंद ठेवलेले बरे असा विचार ट्रकवाले करत आहेत. त्यामुळे दर वाढवल्याशिवाय वाहतूक करणे ट्रकमालकांना मुळीच परवडण्यासारखे नसल्याने सर्वजण दर वाढीवर ठाम असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. ट्रकवाल्यांना जर दर कमी मिळत असेल तर डिझेलचा दर कमीत कमी ५० ते ५२ असा उतरावावा या मागणीवर सर्व संघटना ठाम असल्याचे यावेळी सांगण्यात आले. गरज पडल्यास सर्व आमदारांना बोलावून त्यांच्यासमवेत बोलणी करून तोडगा काढावा असाही विचार मांडण्यात आला.
तसेच कंत्राटी पद्धतच नको. त्यामुळे सर्वांचे नुकसान झाले आहे. तसेच १४ रुपये दर किंवा डिझेल दरा कपात या एकाच मागणीवर ठाम राहावे किंवा ‘करा किंवा मरा’ या निर्धाराने लढायचे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.