डिझेल अडीच रुपयांनी स्वस्त होणार

0
72

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सातत्याने घसरण होत असल्याने डिझेलच्या दरात अडीच रुपयांनी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. डिझेलच्या दरात कपात झाली तर एवढी मोठी कपात होण्याची चार वर्षांतील ही पहिलीच वेळ असेल. निवडणूक आचारसंहिता असल्याने १९ ऑक्टोबरनंतर दर कपातीची घोषणा होईल. यापूर्वी ८ सप्टेंबर २०१० रोजी डिझेल ३ रुपये ३५ पैसे प्रतिलिटरने स्वस्त झाले होते. डिझेलच्या दरात कपात झाल्यास सणासुदीच्या दिवसांत देशातील जनतेला दिलासा मिळणार आहे.