डिजिटल मीटर्सप्रश्‍नी उद्यापर्यंत अध्यादेश द्या : कोर्ट

0
122

राज्यातील पर्यटक टॅक्सींना डिजिटल मीटर बसविण्याबाबत बुधवारपर्यंत अध्यादेश जारी करावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने काल दिला. पुढील सुनावणी उद्या घेण्यात येईल. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात राज्यातील टूरिस्ट टॅक्सींना डिजिटल मीटर, जीपीएस व इतर सुविधा बसविण्याबाबत एक याचिका दाखल करण्यात आली आहे.