डिचोलीत शॉर्ट सर्किटमुळे हार्डवेअर दुकानाला आग

0
103

>> ५ लाखांचे नुकसान

डिचोली येथील दीनदयाळ भवनाच्या खाली असलेल्या सिद्धी सिरेमिक्स या हार्डवेअर दुकानाला काल दुपारी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे ५ लाखांहून अधिक किमतीचा माल जळून खाक झाला.
डिचोली अग्निसमन दलाचे जवान त्वरीत घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळळा. सुमारे २ तासांच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाने सुमारे ५० लाखाहून अधिक किमतीची मालमत्ता वाचवली. दुपारी ३ च्या दरम्यान दुकान बंद असताना मागून धूर आल्याचे काहींनी बघितले. त्यानंतर डिचोली अग्निशमन दलास खबर देताच दलाचे जवान त्वरीत घटनास्थळी दाखल होऊन मदत कार्य सुरू केले.
मोठ्या प्रमाणात स्टॉक करून ठेवलेल्या या हार्डवेअर दुकानातील सामान जळाले. इथे पेंटसचे डबे असून सुदैवाने त्याने पेट घेतला नसल्यांने मोठा अनर्थ टळला. दुकानाच्या वीज बोर्डलाच आग लागल्याने ही आग सामानाला लागून सर्वत्र पसरली. त्यात मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाले आहे.
याप्रकरणी संध्या खानोलकर यांनी अग्निशमन दलाकडे आगीबाबत तक्रार नोंदवली असून अग्निशमन दलाने सुमारे २ ते ३ लाखांची हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला असता तरी ५ लाखाहून अधिक नुकसान झाल्याचा अंदाज असून नक्की आकडा समजू शकला नाही.