डसोझांच्याही विदेशवारीने प्रशासन कोलमडेल ः कॉंग्रेस

0
103

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर अमेरिकेत काही महिन्यांपासून असताना आता पर्रीकरांनीच नेमलेल्या त्रिसदस्यीय मंत्री समितीतील मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे सुद्धा विदेशात (पोर्तुगाल) गेल्याने प्रशासनावर मोठा परिणाम होणार आहे, असे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल सांगितले. हे सर्व म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याचेही ते म्हणाले.

डिसोझा एका महिन्यासाठी पोर्तुगालला गेले असून आपल्या खात्यांचा ताबा त्यांनी विदेशात असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे दिल्याने त्या खात्यांचे प्रशासनही ठप्प होण्याची भीती चोडणकर व सुरेंद्र फुर्तादो यांनी व्यक्त केली आहे.
डिसोझा यांच्याकडे नगरविकास, कायदा व न्यायपालिका, विधानसभा व्यवहार व प्रोव्हेदोरिया अशी महत्त्वाची खाती आहेत.