टॅक्सीचालकांचा आंदोलनाचा इशारा

0
111

>> गोवा माईल्स बंदची मागणी

ऍप आधारित गोवा माईल्स ही टॅक्सीसेवा रद्दबातल करण्याची मागणी येत्या १० दिवसांत मान्य न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा काल टूरिस्ट टॅक्सी मालकांनी ताळगाव येथे आयोजित केलेल्या सभेत दिला. ताळगाव येथील सामाजिक सभागृहात असोसिएशन ऑफ टूरिस्ट टॅक्सी असोसिएशनने ही सभा आयोजित केली होती.

या सभेत राज्यभरातील टूरिस्ट टॅक्सी मालकांची मोठी उपस्थिती होती. या सभेत कॉंग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार चर्चील आलेमाव, गोवा प्रदेश महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष प्रतिमा कुतिन्हो, कॉंग्रेसचे ट्रॉजन डिमेलो यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला. सरकारने गोवा माईल्स टॅक्सी सेवा रद्दबातल न केल्यास कुटुंबीयांसमवेत रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे रहिवासी दाखला नसलेल्या व्यक्तीला राज्यात ऍप आधारित टॅक्सी सेवा सुरू करण्यास मान्यता देऊ नये, अशी मागणी केल्याचे आमदार आलेमाव यांनी सभेत बोलताना सांगितले. सरकारने स्थानिक टॅक्सी चालकांच्या हिताचा विचार करण्याची गरज आहे, असे आमदार रेजिनाल्ड यांनी सभेत बोलताना सांगितले.