टी-टेनला ऑलिंपिकमध्ये स्थान हवे ः ऑईन मॉर्गन

0
145

टी-टेन या क्रिकेटच्य सर्वांत वेगाने लोकप्रिय होत असलेल्या प्रकाराचा ऑलिंपिकमध्ये समावेश करावा, अशी मागणी इंग्लंडला पहिल्यांदा विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार ऑईन मॉर्गन याने केली आहे. तो पुढे म्हणाला की, ऑलिंपिकमध्ये टी-टेन क्रिकेट व्हायला हवे. क्रिकेटचे हे स्वरुप खूप छोटे असते. त्यामुळे १० दिवसांमध्ये ही टी-टेन स्पर्धा संपून जाईल आणि ऑलिंपिकच्या दृष्टीने हे योग्यही ठरेल.

यापूर्वी १९०० साली ऑलिंपिकमध्ये क्रिकेट खेळले गेले होते. तर, १९९८ला राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही क्रिकेटचा समावेश होता. मात्र क्रिकेटचा टी-ट्वेंटी सामना संपण्यास किमान साडे तीन तास व वनडे सामना संपण्यास सात ते साडेसात तास लागत असल्यामुळे अशा प्रकारच्या बहु क्रीडा प्रकार असलेल्या मोठ्या स्पर्धांमध्ये क्रिकेटला सामील करण्यात येत नाही. २०२२मध्ये होणार्‍या बर्मिंघम राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये महिला टी-ट्वेंटी स्पर्धेचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता ऑलिंपिकमध्येही क्रिकेटचा समावेश व्हावा, असे मॉर्गनला वाटते.