टीम इंडियाच्या कर्णधारपदी पृथ्वी शॉ

0
88

पुढील वर्षी १३ जानेवारीपासून न्यूझीलंडमध्ये होणार्‍या अंडर १९ क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी मुंबई रणजी संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ याची निवड करण्यात आली आहे. इंग्लंडमध्ये या वर्षारंभी झालेल्या युथ एकदिवसीय मालिकेत ९२.६६च्या सरासरीने धावा केलेल्या शुभम गिल याच्याकडे उपकर्णधारपद सोपविण्यात आले आहे. हरियाणाच्या हिमांशू राणा व आसामचा लेगस्पिनर रियान पराग यांनादेखील १५ सदस्यीय संघात स्थान देण्यात आले आहे. या व्यतिरिक्त ५ खेळाडूंना राखीव खेळाडूंच्या यादीत ठेवण्यात आले आहे. या सर्व खेळाडूंसाठी ८ ते २२ डिसेंबर या कालावधीत बंगळुरू येथे तयारी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भारताने आत्तापर्यंत तीनवेळा या स्पर्धेचे विजेेतेपद पटकावले असून मागील वेळी भारताला विंडीजकडून अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले होते.

भारतीय संघ ः पृथ्वी शॉ, शुभम गिल, मनोज कालरा, हिमांशू राणा, अभिषेक शर्मा, रियान पराग, आर्यन जुयल, हार्विक देसाई, शिवम मावी, कमलेश नागरकोटी, ईशान पोरल, अर्शदीप सिंग, अनुकूल रॉय, शिवा सिंग व पंकज यादव, राखीव ः ओम भोसले, राहुल चाहर, निनाद राठवा, उर्विल पटेल व आदित्य ठाकरे.