टीम इंडियाचा जपानवर १० गड्यांनी विजय

0
113

विद्यमान विजेत्या भारताने १९ वर्षांखालील क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धेत काल मंगळवारी नवोदित जपानचा १० गडी व ४५.१ षटके राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारलेल्या भारताने जपानचा २२.५ षटकांत ४१ धावांत फडशा पाडला. गुगली गोलंदाज रवी बिश्‍नोई याने ४ गडी बाद करत प्रभाव पाडला.
कर्णधार प्रियम गर्ग याने वापरलेल्या चारही गोलंदाजांनी गडी बाद करत विश्‍वास सार्थ ठरवला. जपानच्या एकाही फलंदाजाला वैयक्तिक सात धावांच्या पलीकडे मजल मारता आली नाही. भारताने दिलेल्या १८ अवांतर धावांमुळे जपानला ‘चाळीशी’ ओलांडता आली. भारताने विजयासाठीचे लक्ष्य ४.५ षटकांत गाठले. यशस्वी जैसवाल २९ व कुमार कुशाग्र १३ धावांवर नाबाद राहिला. शेवटच्या साखळी सामन्यात भारताचा संघ शुक्रवारी न्यूझीलंडशी दोन हात करणार आहे.

धावफलक
जपान ः मार्कुस थुरगाते त्रि. गो. त्यागी १, शू नोगुची त्रि. गो. बिश्‍नोई ७, नील दाते पायचीत गो. त्यागी ०, देबाशिष साहू झे. गर्ग गो. पाटील ०, काझुमासा ताकाहाशी त्रि. गो. बिश्‍नोई ०, ईशान फरतयाल पायचीत गो. बिश्‍नोई ०, ऍश्‍ले थुरगाटे झे. जैसवाल गो. बिश्‍नोई ०, केंटो ओटा डोबेल झे. वीर गो. आकाश ७, मॅक्स क्लेमेंत पायचीत गो. त्यागी ५, युगंधर रेथारेकर झे. वीर गो. आकाश १, सोरा इचिकी नाबाद १, अवांतर १९, एकूण २२.५ षटकांत सर्वबाद ४१
गोलंदाजी ः कार्तिक त्यागी ६-०-१०-३, आकाश सिंग ४.५-१-११-२, रवी बिश्‍नोई ८-३-५-४, विद्याधर पाटील ४-१-८-१
भारत ः यशस्वी जैसवाल नाबाद २९, कुमार कुशाग्र नाबाद १३, अवांतर ०, एकूण ४.५ षटकांत बिनबाद ४२
गोलंदाजी ः युगंधर रेथारेकर २-०-१९-०, केंटो ओटा डोबेल २-०-१६-०, ऍश्‍ले थुरगाटे ०.५-०-७-०