टीम इंडियाकडून विंडीजला ‘व्हाईटवॉश’

0
128

>> शेवटच्या टी-२०तही एकतर्फी विजय

>> विराट, ऋषभची नाबाद अर्धशतके

>> दीपक चहर चकमला

कर्णधार विराट कोहली अणि ऋषभ पंत यांनी अर्धशतकांसह तिसर्‍या विकेटसाठी केलेल्या १०६ धावांच्या भागीदारीच्या जोरावर टीम इंडियाने तिसर्‍या टी-२० लढतीत वेस्ट इंडीजवर ७ गड्यांनी मात करीत मालिका ३-० अशी जिंकत निर्भेळ यश मिळविले. दीपक चहरने आपला दुसराचा सामना खेळताना ३ षट्‌कांत ४ धावां देत ३ बळी मिळविले. भारताने ८ वर्षानंतर विंडीजला टी-२० मालिकेत पराभूत केले.
विंडीजकडून मिळालेले १४७ धावांचे विजयी लक्ष्य भारतीय संघाने ३ गड्याच्या मोबदल्यात गाठले. शिखर धवन (३) आणि लोकेश राहुल (२०) झटपट तंबूत परतले.

परंतु त्यानंतर फलंदाजीस आलेल्या कर्णधार विराट कोहलीने सूत्रे आपल्या घेत युवा ऋषभ पंतच्या साथीत भारताचा विजय साकारला. या दोघांनी शानदार अर्धशतके नोंदवित तिसर्‍या विकेटसाठी १०६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. विजयासाठी १४ धावांची आवश्यकता असताना कोहली ६ चौकारांनिशी ४५ चेंडूत ५९ धावा करून बाद झाला. कोहली बाद झाल्यानंतर पंतने मनीष पांडेच्या साथीत संघाच्या विजयाबरोबर मालिकेतील निर्भेळ यशावर शिक्कामोर्तब केला. पंतने ४ चौकार व ४ षट्‌कारांच्या सहाय्याने ४३ चेंडूत ६५ धावांची तडफदार नाबाद अर्धशतकी खेळी केली. पांडे २ धावांवर नाबाद राहिला. विंडीजकडून ओशाने थॉमसने २ तर फेबियन ऍलेनने १ बळी मिळविला.

तत्पूर्वी, भारतीय कर्णधार विराट कोहलीकडून प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रण मिळाल्यानंतर विंडीजने ६ गडी गमावत १४६ अशी धावसंख्या उभारली. विंडीजची सुरुवात एकदम खराब झाली. सुमारे एका वर्षानंतर दीपक चहरने मिळालेल्या संधीचे सोने करताना विंडीजला प्रारंभीच तीन झटके दिले. त्याने विंडीजविरुद्ध भारताकडॅन सर्वोत्कृष्ट कामगिरी कररणारा गोंदलंदाज बनताना ३ षट्‌कांत ४ धावांत देत तीन बळी मिळविले. त्यामुळे विंडीजची स्थिती ३ बाद १४ अशी झाली होती. त्याने सुनील नारायण (२), इविन लुईश (१०) आणि शिमरॉन हेटमायर (१) या विंडीच्या आघाडीच्या फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखविले. परंतु त्यानंतर सध्या पूर्ण बहरात असलेल्या कीरॉन पोर्लाडने ६ चौकार व १ षट्‌कारांच्या सहाय्याने ४५ चेंडूत ५८ धावांची अर्धशतकी खेळी करीत संघाला १४६ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली. रोवमेन पॉवेलने ३२ तर निकोलस पूरने १७ धावा जोडल्या. भारतातर्फे दीपकच्या ३ बळींव्यतिरिक्त नवदीप सैनीने २ तर आपला पदार्पणाचा सामना खेळणार्‍या राहुल चहरने १ बळी मिळविला.

धावफलक
वेस्ट इंडीज ः इविन लुईस पायचित गो. दीपक चहर १०, सुनील नारायण झे. नवदीप सैनी गो. दीपक चहर २, शिमरॉन हेटमायर पायचित गो. दीपक चहर १, कीरॉन पोलार्ड त्रिफळाचित गो. नवदीप सैनी ५८, निकोलस पूरन झे. ऋषभ पंत गो. नवदीप सैनी १७, रोवमन पॉवेल नाबाद ३२, कार्लोस ब्रेथवेट झे. वॉशिंग्टन सुंदर गो. राहुल चहर १०, फेबियन ऍलेन नाबाद ८. अवांतर ः ८. एकूण २० षट्‌कांत ६ बाद १४६ धावा. गडी बाद होण्याचा क्रम ः १-४ (सुनील नारायण, १.५), २-१३ (इविन लुईस, ३.१), ३-१४ (शिमरॉन हेटमायर, ३.५), ४-८० (निकोलस पूरन, १३.१), ५-१०५ (कीरॉन पोलार्ड, १५.४), ६-११९ (कार्लोस ब्रेथवेट, १७.२). गोलंदाजी ः भुवनेश्वर कुमार ३/०/१९/०, दीपक चहर ३/१/४/३, नवदीप सैनी ४/०/३४/२, राहुल चहर ३/०/२७/१, वॉशिंग्टन सुंदर ३/०/२३/०, कृणाल पंड्या ४/०/३५/०.
भारत ः लोकेश राहुल झे. निकोसल पूरन गो. फॅबियन ऍलेन २०, शिखर धवन झे. शेल्डन कॉटरेल गो. ओशेन थॉमस ३, विराट कोहली झे. इविन लुईस गो. ओशेन थॉमस ५९, ऋषभ पंत नाबाद ६५, मनीष पांडे नाबाद २.
अवांतर ः १. एकूण १९.१ षट्‌कांत ३ बाद १५० धावा. गडी बाद होण्याचा क्रम ः १-१० (शिखर धवन, २.००), २-२७ (लोकेश राहुल, ४.४), ३-१३३ (विराट कोहली, १७.३). गोलंदाजी ः शेल्डन कॉटरेल ४/०/२६/०, ओशेन थॉमस ४/०/२९/२, फेबियन ऍलेन ३/०/१८/१, सुनील नारायण ४/०/२९/०, कार्लोस ब्रेथवेट २.१/०/२५/०, कीमो पॉल २/०/२३/०.