टाइप वन मधुमेह आणि उपचारपध्दती

0
196
  •  डॉ. प्रदीप महाजन

पेशींवर आधारित उपचारपद्धती मधुमेहाच्या मूळ कारणावर उपचार करते, म्हणजेच, बिटा पेशींचा नाश आणि इन्सुलिन तयार होण्यास प्रतिरोध या कारणांवर उपचार करते. म्हणूनच हळुहळू पण कायमस्वरूपी असे परिणाम मिळतात.

टाइप वन मधुमेह हा तरुणांमध्ये सर्वाधिक आढळणार्‍या विकारांमधील एक आहे. भारतातील ९७,००० मुलांना टाइप वन मधुमेह आहे. संपूर्ण लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण केवळ ५-१० टक्के असले, तरी या विकाराचे तत्कालिक व दीर्घकालीन परिणाम गंभीर आहेत. यासाठी कारणीभूत ठरणार्‍या निश्चित घटकाचे (डेफिनिटिव्ह कॉज्युएटिव्ह एजंट) वर्णन अद्याप शक्य झाले नसले तरी अनुवांशिक आणि वातावरणातील घटक तसेच रोगप्रतिकार यंत्रणेतील बिघाड ही टाइप वन मधुमेहाची कारणे समजली जातात.

या विकाराचा सर्वांत मोठा दुष्परिणाम म्हणजे हा खूप लहान वयात होतो आणि त्यामुळे रुग्णाची भावनिक स्थिती बिघडते. तसेच दैनंदिन आयुष्याची घडी विस्कटून जाते. औषधे आणि इन्सुलिन आयुष्यभर घ्यावे लागते. कारण, हे एजंट्स विकार बरा करू शकत नाहीत. यामुळे कुटुंबावर आर्थिक बोजाही पडतो.
मधुमेहावरील उपचारांच्या आधुनिक पद्धतींची माहिती रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबांना साधारणपणे नसते. यापैकी एक प्रगत उपचारपद्धती म्हणजे रिजनरेटिव्ह (पुनरुज्जीवनावर आधारित) औषधे आणि पेशींवर आधारित उपचार. यांमुळे शरीरातील अंगभूत उपचार क्षमतेची जोपासना होते आणि अनेकविध विकारांचे व्यवस्थापन होते.

१. तुमच्या शरीरातच उपचारांची सगळी साधने असतात. लक्षणांवर वेदनाशामक उपचार करण्यापेक्षा त्यांचा विश्वास विकाराच्या मुळाशी जाऊन उपचार करणार्‍या पेशीआधारित उपचारपद्धतीवर आहे. टाइप वन मधुमेहामध्ये इन्सुलिन तयार करणार्‍या पेशीच नष्ट होतात. आपल्या शरीरातील पेशींमध्ये स्वत:च्या नवनिर्माणाची क्षमता असतेच, त्याचप्रमाणे स्वत:ला बदलून वेगळ्या पेशींमध्ये रूपांतरित होण्याचीही क्षमता असते. ते पुढे म्हणतात, टाइप वन मधुमेह हा रोगप्रतिकारक यंत्रणेचा विकार आहे. पेशीवर आधारित उपचारपद्धती रोगप्रतिकार प्रणालीचे नियमन करू शकते. शरीरातील दाह कमी करण्याची क्षमताही पेशींमध्ये असते. या सर्व क्षमतांमुळे मधुमेहग्रस्त रुग्णांमध्ये स्वादूपिंडाच्या कार्याचे पुनरुज्जीवन होऊन त्यांना खात्रीने लाभ होतो आणि त्याबरोबर आजारांचेही शमन होते. इन्सुलिन देण्याऐवजी पेशींवर आधारित उपचार दिल्यास टाइप वन मधुमेहाने ग्रासलेल्या रुग्णांमध्ये काही काळाने रक्तातील साखरेच्या पातळीवर अधिक चांगले नियंत्रण दिसून आले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून शरीरातील रोगप्रतिकार यंत्रणेचा समतोल/होमिओस्टॅसिसही राखण्यात मदत होते, असेही दिसून आले आहे.
व्यक्तीनुसार उपचार करण्याच्या आमच्या पद्धतीमुळे रुग्णांना १-२ सत्रांतच फायदे जाणवू लागतात. रक्तातील साखरेची पातळी कमी होते आणि रुग्णाचे सामान्य आरोग्यही सुधारते. अर्थात, रुग्णाला सुरू असलेल्या इन्सुलिन डोसमध्ये किंवा तोंडावाटे घेण्याच्या औषधांमध्ये रक्तातील साखरेची पातळी स्थिर झाल्यानंतरच बदल केले जातात. साखरेची पातळी स्थिर झाल्यानंतर त्यानुसार औषधांचे समायोजन केले जाते आणि अखेरीस औषधे किंवा इन्सुलिन घेणे थांबवण्याचा सल्ला दिला जातो,
पेशींवर आधारित उपचारपद्धती मधुमेहाच्या मूळ कारणावर उपचार करते, म्हणजेच, बिटा पेशींचा नाश आणि इन्सुलिन तयार होण्यास प्रतिरोध या कारणांवर उपचार करते. म्हणूनच हळुहळू पण कायमस्वरूपी असे परिणाम मिळतात. या उपचारपद्धतीची किती सत्रे लागतील हे रुग्णाचे वय, मधुमेहाची तीव्रता, मधुमेहासोबत आलेल्या अन्य विकारांची स्थिती आणि जीवनशैली यांवर अवलंबून आहे. यात रुग्णाच्या स्वत:च्या शरीरातील पेशीच वापरल्या जात असल्याने ही उपचारपद्धती सुरक्षित आणि प्रभावी आहे. म्हणूनच या उपचारपद्धतीबद्दल जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे. असे झाल्यास समाजातील सर्व स्तरांतील रुग्णांना याचा लाभ मिळेल.