झेडपी निवडणूक तारीख बदल अधिसूचना जारी

0
209

राज्यातील जिल्हा पंचायत (झेडपी) निवडणुकीच्या बदलण्यात आलेल्या नवीन तारखेची अधिसूचना पंचायत खात्याचे सचिव संजय गिहार यांनी सरकारी पत्रकात काल जारी केली आहे.

राज्यातील जिल्हा पंचायतींच्या ५० जागांसाठी १५ मार्च २०२० रोजी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. राज्यातील प्रमुख उत्सव शिमगोत्सव जिल्हा पंचायत निवडणुकीच्या काळात येत असल्याने निवडणुकीच्या तारखेत बदल करण्यासाठी राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाकडे परवानगी मागण्यात आली होती. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आता २२ मार्च ही तारीख निश्‍चित केली आहे.

दरम्यान, जिल्हा पंचायतीची प्रभाग राखिवता जाहीर करण्यात आलेली नाही. प्रभाग राखिवतेकडे राजकीय पक्ष आणि इच्छुकांचे लक्ष लागले आहे. भाजपकडून जाणीवपूर्वक प्रभाग राखिवता जाहीर करण्याकडे उशीर केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.