झंझावाती विजयासह नदाल दुसर्‍या फेरीत

0
156
Spain's Rafael Nadal hits a return against Dominican Republic's Victor Estrella Burgos during their men's singles first round match on day one of the Australian Open tennis tournament in Melbourne on January 15, 2018. / AFP PHOTO / Greg Wood / -- IMAGE RESTRICTED TO EDITORIAL USE - STRICTLY NO COMMERCIAL USE --

>> व्हीनस, स्टीफन्स, अँडरसन, इस्नरचे आव्हान आटोपले

अव्वल मानांकित स्पेनच्या राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. काल सोमवारी झालेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत त्याने जागतिक क्रमवारीत ८१व्या स्थानावर असलेल्या व्हिक्टर एस्ट्रेला बुर्गोस या डॉमनिकन खेळाडूचा ९४ मिनिटांत ६-१, ६-१, ६-१ असा फडशा पाडला. पुढील फेरीत त्याचा सामना अर्जेंटिनाच्या लिओनार्डो मायेर याच्याशी होणार आहे.
तृतीय मानांकन लाभलेल्या बल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव याला सुद्धा विजयासाठी अधिक मेहनत घ्यावी लागली नाही. त्याने कॅनडाच्या डेनिस नोवाक याला ६-३, ६-२, ६-१ अशी धूळ चारली. महिला एकेरीत द्वितीय मानांकित कॅरोलिन वॉझनियाकीने पहिल्या फेरीचा अडथळा पार करत रोमानियाच्या मिहाईला बुझानेस्कू हिला ६-२, ६-३ असे हरविले.

दहावी मानांकित कोको वांदेवेघे, पाचवी मानांकित व्हीनस विल्यम्स, तेरावी मानांकित स्लोन स्टीफन्स या काही प्रमुख खेळाडूंसह शुई पेंग, डॉमनिका सिबुलकोवा, एकतारिना माकारोवा या मानांकित खेळाडूंना महिला एकेरीच्या पहिल्याच फेरीत गाशा गुंडाळावा लागला. पुरुष एकेरीत आठवा मानांकित जॅक सॉक, २७वा मानांकित फिलिप कोहलश्रायबर, ११वा मानांकित केविन अँडरसन, सोळावा मानांकित जॉन इस्नर यांना बाहेरचा रस्ता धरावा लागला.

अन्य मानांकित खेळाडूंचे निकाल ः पहिली फेरी ः पुरुष एकेरी ः ज्यो विल्फ्रेड त्सोंगा (१५) वि. वि. केविन किंग ६-४, ६-४, ६-१, निक किर्गियोस (१७) वि. वि. रॉजरियो दुर्ते सिल्वा ६-२, ६-२, ६-४, लुकास पॉली (१८) पराभूत वि. रुबन बेमेलमान्स ४-६, ४-६, ७-६, ६-७, जॅक सॉक (८) पराभूत वि. युची सुगिता १-६, ६-७, ७-५, ३-६, दामिर झुमूर (२८) वि. वि. पावलो लॉरेन्झी ३-६, २-६, ७-६, ६-२, ६-४, मरिन चिलिच (६) वि. वि. वासेक पोस्पिसिल ६-२, ६-२, ४-६, ७-६, दिएगो श्‍वाटर्‌‌झमन (२४) वि. वि. दुसान लाजोविच २-६, ६-३, ५-७, ६-४, ११-९, फिलिप कोहलश्रायबर (२७) पराभूत वि. योशिहितो निशिओका ३-६, ६-२, ०-६, ६-१, २-६, जॉन इस्नर (१६) पराभूत वि. मॅथ्यू एबडेन ४-६, ६-३, ३-६, ३-६, आंद्रेय रुबलेव (३०) वि. वि. डेव्हिड फेरर ७-५, ६-७, ६-२, ६-७, ६-२, केविन अँडरसन (११) पराभूत वि. काईल एडमंड ७-६, ३-६, ६-३, ३-६, ४-६, पाब्लो कारेनो बुस्टा (१०) वि. वि. जेसन कुबलर ७-५, ४-६, ७-५, ६-१, पाब्लो कुएवास (३१) वि. वि. मिखाईल युझनी ७-६, ६-३, ७-५.
महिला एकेरी ः दारिया गावरिलोवा (२३) वि. वि. इरिना फालकोनी ६-१, ६-१, इलिना स्वितोलिना (४) वि. वि. इवाना जोरोविच ६-३, ६-२, दारिया कसातकिना (२२) वि. वि. ऍना कॅरोलिना श्मिएदलोवा ६-०, ६-३, शिया पेंग (२५) पराभूत वि. मार्टा कोस्तयूक २-६, २-६, अनास्यासिया पावलुचेंकोवा (१५) वि. वि. कॅतरिना कोझलोवा ३-६, ६-४, ६-३, ऍनेट कोंटावेट (३२) वि. वि. आलेक्झांड्रा क्रुनिक ६-४, ७-५, कोको वांदेवेघे (१०) पराभूत वि. टिमिया बाबोस ७-६, ६-२, व्हीनस विल्यम्स (५) पराभूत वि. बेलिंडा बेनसिच ३-६, ५-७, किकी बर्टेन्स (३०) वि. वि. सिसी बेलिस ६-७, ६-४, ६-२, डॉमनिका सिबुलकोवा (२४) पराभूत वि. काया कानेपी २-६, २-६, इकतारिना माकारोवा (३१) पराभूत वि. इरिना बेगू ६-३, ४-६, ६-८, ज्युलिया जॉर्जेस (१२) वि. वि. सोफिया केनिन ६-४, ६-४, स्लोन स्टीफन्स (१३) पराभूत वि. झांग शुई ६-२, ७-६, ६-२, येलेना ओस्टापेंको (७) वि. वि. फ्रान्सेस्का शियावोन ६-१, ६-४, माग्दालेना रिबरिकोवा (१९) वि. वि. टेलर टाऊनसेंड ६-०, ७-५.