ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार ह. मो. मराठे यांचे निधन

0
128

प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचे काल पुण्यात निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. दीनानाथ मंगेशकर इस्पितळामध्ये उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. दोन वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेले ‘दोन स्पेशल’ हे प्रेक्षक – समीक्षकांची दान मिळवलेले नाटक हमोंच्या ‘न्यूज स्टोरी’ या कथेवर आधारित आहे.

कोकणातील दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावात एका गरीब कुटुंबात जन्मलेले ‘हमो’ १९७० च्या सुमारास ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ व ‘काळेशार पाणी’ या दोन लघू कादंबर्‍यांमुळे लेखक म्हणून वाचकांसमोर आले. घोडा, न्यूजस्टोरी, युद्ध, ज्वालामुख, टार्गेट या कथा व मार्केट, सॉफ्टवेअर या कादंबर्‍यांमधून त्यांनी औद्योगिक जीवन रेखाटून त्यावर मार्मिक भाष्यही केले. व्यंगात्मक लेखनाची त्यांची १५ ते २० पुस्तके प्रकाशित झाली आहेत.