ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचे निधन

0
148

दिग्गज कलाकारांच्या जाण्याने बॉलिवूडला एका मागे एक धक्के बसत आहेत. बॉलिवूडमधील आणखी एका कलाकाराने जगाचा निरोप घेतला आहे. बॉलिवूडमधील ज्येष्ठ विनोदी अभिनेते जगदीप यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ‘शोले’मधील सूरमा भोपाली ही त्यांची गाजलेली भूमिका. जगदीप यांनी शोले, ब्रम्हचारी, अंदाज अपना अपना, पुराना मंदिर, कुरबानी, शेहनशाह या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.