जून महिन्यात ४० इंच पावसाची नोंद

0
203

राज्यात मोसमी पावसाने दमदार सुरुवात केली असून जून महिन्यात साधारण ४० इंच पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत मोसमी पावसाचे सरासरी प्रमाण १८ टक्के जास्त आहे. दरम्यान, पेडण्यात मोसमी पावसाने इंचाचे अर्धशतक (५०.७५ इंच) पूर्ण केले आहे.
राज्यात यावर्षी मोसमी पावसाचे आगमन चार- पाच दिवस उशिराने झाले. या महिन्यात ११ ते २० जून या काळात जोरदार पाऊस पडल्याने पावसाचे सरासरी प्रमाण वाढले आहे. राज्यात आत्तापर्यंत ३९.८९ इंच पावसाची नोंद झाली आहे. ओल्ड गोवा येथे जोरदार पावसाची नोंद झाली आहे. या ठिकाणी ४७.२८ इंच पाऊस पडला आहे. मुरगाव येथे ४२.०७ इंच, पणजी येथे ४२.०२ इंच, काणकोण येथे ४१.५३ इंच, साखळी येथे ४१.३८ इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यात इतर ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे.