जीटीडीसीच्या हॉटेल्सचे १८ कोटी खर्चून नूतनीकरण

0
134

सुमारे १८ कोटी रु. खर्च करून पर्यटन विकास महामंडळ जीटीडीसी पणजी, कळंगुट व जुने गोवे येथील आपल्या रेसिडन्सींचे नूतनीकरण करीत असून कळंगुट रोसिडेन्सीमध्ये तर विवाह सोहळेही करता येतील यासाठीची सोय करण्यात येणार असल्याचे पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांनी काल सांगितले.
कळंगुट रेसिडन्सीतील रेस्टॉरन्टलाही नवा साज चढवण्यात आलेला असून अत्यंत आकर्षक रूप देण्यात आले आहे. या रेसिडन्सीच्या नूतनीकरणावर सुमारे ७ कोटी रु. खर्च करण्यात येणार आहेत.
पणजी व जुने गोवे येथील रेसिडन्सीच्या नूतनीकरणाचे काम यापूर्वीच सुरू झालेले आहे. पणजी रेसिडन्सीच्या नूतनीकरणावर ९ कोटी रु. खर्च करण्यात येणार आहेत. तेथील रेस्टॉरन्टच्या नूतनीकरणाचे काम बाहेर देण्यात आलेले आहे.