जावडेकरांनी दिली सोमवारी वेळ : नेरी

0
146

कळसा भांडुरा प्रकल्पाला पर्यावरणासंबंधीचे दिलेले पत्र मागे घेण्याच्या मागणीसाठी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय शिष्टमंडळ दि. ४ नोव्हेंबर रोजी दिल्लीला जाणार आहे. त्यांना पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सकाळी ११ वाजता भेटण्याची वेळ दिली असल्याचे जलस्रोतमंत्री फिलीप नेरी रॉड्रीगीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पर्वरी येथे रस्ता रोको आंदोलन करून लोकांना अडचणी आणल्याचे समजताच आपण त्यांनी आंदोलन मागे घ्यावे अशी मागणी करत आहे. सोमवारी जावडेकरांना भेटून ते पत्र मागे घेण्याची मागणी करणार असून त्यांनी नकार दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन ते पत्र मागे घेण्यासाठी विनंती करणार आहोत. कळसा भांडुरास्थळी पहाणी करण्यासाठी परवानगी मागणार असल्याचे फिलिप नेरी म्हणाले.