जायकाप्रकरणी दिगंबर कामत विशेष न्यायालयात उपस्थित

0
78

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी जायका प्रकरणी म्हापसा येथील विशेष न्यायालयात काल हजेरी लावली. सक्तवसुली विभागाने या मनी लॉण्डरींग प्रकरणी तक्रार केली आहे.

या प्रकरणी माजी मुख्यमंत्री तथा मडगावचे आमदार कामत प्रमुख संशयित आरोपी आहेत. तर माजी बांधकाम मंत्री तथा बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव दुसरे संशयित आरोपी आहेत. जायका प्रकरणी कामत यांनी खास न्यायालयात उपस्थिती लावल्यानंतर त्यांची वैयक्तिक २५ हजार रुपयांच्या हमीवर जामिनावर सुटका करण्यात आली.

माजी मंत्री तथा आमदार चर्चिल आलेमाव अनुपस्थित होते. चर्चिल राज्याबाहेर असल्याची माहिती न्यायालयाला देण्यात आली. चर्चिल आलेमाव यांना ११ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याची सूचना करण्यात आली आहे.