जागतिक बँकेचे भारताला १८ अब्ज डॉलर्स कर्ज

0
138

भारताच्या प्रस्तावित ९ टक्के विकास दरावर विश्‍वास दाखवून येत्या तीन वर्षांच्या काळात जागतिक बँक भारताला १८ अब्ज डॉलर्स कर्ज उपलब्ध करून देणार आहे. भारत जागतिक बँकेचा एक प्रमुख ग्राहक आहे. गेल्या आर्थिक वर्षी जागतिक बँकेने भारताला ५.२ अब्ज डॉलर्स कर्ज दिले होते. गेल्या तीन वर्षांत भारताला जागतिक बँकेकडून ९.८ अब्ज अमेरिकन डॉलर्स कर्ज प्राप्त झाले आहे. जागतिक बॅठकेचे अध्यक्ष जीम योंग किम सध्या भारतभेटीवर आहेत. पंतप्रधान मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी ते आर्थिक विकासवाढ व सुधारांना कटीबद्ध असल्याचे दिसून आले, त्यामुळे जागतिक बँक पूर्ण सहकार्य करणार असल्यचे किम म्हणाले.