जम्मू काश्मीरात विक्रमी ७१.२८% मतदान 

0
98

१२१ वर्षीय महिलेचे मतदान

जम्मू काश्मीरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदानात रामबन जिल्ह्यात १२१ वर्षीय महिला मतदाराने काल मतदान केले. १२१ वर्षीय नूर बीबीने कब्बी गावातील मतदान केंद्रावर काल दुपारी मतदान केल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून देण्यात आली. परिवारजनांसोबत ती मतदानाला आली होती. तिने अजून एकही मतदान चुकविलेले नसल्याचे तिच्या परिवारजनांनी सांगितले. रामबन जिल्ह्यात फुटीरतावाद्यांचे दहशतवादी राजकारण शिखरावर होते त्याकाळातही बंदुकीच्या भीतीला न जुमानता तिने मतदान केले आहे. जम्मू काश्मीरमध्ये १९५७ साली निवडणूक सुरू झाली तेव्हापासून तिने मतदान केले आहे.