जमीन रुपांतर शुल्कात १० टक्क्यांनी वाढ

0
200

राज्य सरकारने जमीन रूपांतर शुल्कात १० टक्के वाढ केली आहे. यासंबंधीची एक सूचना महसूल खात्याने सरकारी पत्रकाद्वारे काल जाहीर केली.

घरासाठी जमीन रूपांतर एस १- ७० रुपयांवरून ८० रुपये केली आहे. तर, एस २- ५५ रुपयांवरून ६० रुपये, एस ३- ४५ रुपयांवरून ५० रुपये आणि एस ४ – ३५ रुपयांवरून ४० रुपये केली आहे.

व्यावसायिक कामासाठी सी १ – ४०० रुपयांवरून ४४० रुपये, सी २- ३५० वरून ३९० रुपये, सी ३ – ३०० वरून ३३० रुपये, सी ४ – २५० वरून २८० रुपये दर निश्‍चित केला आहे. औद्योगिक जमीन रूपांतर दर १०० रुपयांवरून ११० रुपये करण्यात आला आहे.