जमाना ‘रोबो-वेटर्स’चा!

0
107

उपाहारगृहात खाण्यासाठी जाणे हा शहरी-निमशहरी भागातील बर्‍याच कुटुंबांचा सर्वांत आवडता टाइमपास झाला आहे असे म्हणता येईल! किंबहुना पुण्या-मुंबईतील घरांमध्ये स्वयंपाक केला जातो की नाही अशीच शंका यावी इतके हे प्रकरण बोकाळले आहेत!! मोठ्या शहरांतील उपाहारगृहांचे स्वरूपही (आंतरराष्ट्रीय निकषांबरोबरच) बदलते आहे. मिळणारे खाद्यपदार्थ, अंतर्गत सजावट ह्यांबरोबरच सेवा पुरवण्याची पद्धतही (म्हणजेच ‘सर्व्हिस’ किंवा ‘वेटिंग’) कात टाकते आहे. सध्या बरेच ठिकाणी ‘सेल्ङ्ग सर्व्हिस’ असते. वेटर्सवरील खर्च कमी करण्यासाठी हे केले जाते (मग अशा ठिकाणचे दर पारंपरिक उपाहारगृहांपेक्षा कमी असायला हवेत – ते तसे नसतात!! पण जाऊ दे आपला आत्ता तो मुद्दा नाही). त्याचबरोबर सर्वांच्याच हातात असलेल्या नवतंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी नवनवीन पद्धती अवलंबल्या जात आहेत. स्वयंपाकात ङ्गक्त ‘मदत’ करणारी ओव्हन किंवा ङ्गूड प्रोसेसर सारखी यंत्रे मागे पडून त्यांची जागा आता लवकरच यंत्रमानव किंवा ‘रोबो-कुक्स’ घेणार आहेत. आपल्याकडेही चांगल्या उपाहारगृहांमधून वेटर्स आपली ऑर्डर स्मार्टङ्गोन किंवा टॅबवर घेताना आढळतात. ही ऑर्डर थेट उपाहारगृहाच्या स्वयंपाकघरातील स्क्रीनवर पोचते. ‘चेन-रेस्तोरॉँ’ तसेच स्वतंत्रपणे चालवलेल्या मध्यम आकाराच्या अनेक उपाहारगृहांत ही पद्धत रुजू लागली आहे. याचबरोबर ग्राहकाच्या टेबलावर अन्नपदार्थ आणून देण्याचे कामही यंत्रमानव करू लागले आहेत! ही संकल्पना राबवण्यासाठी सुरूवातीला अवाढव्य गुंतवणूक लागत असली तरी तिची वाढती लोकप्रियता पाहता तिचे लोण जगभरात पसरते आहे.
सध्याच्या बाजारपेठ-आधारित जमान्यामध्ये, उत्पादनाची विक्री यशस्वी करण्यात, लहान मुले आणि तरुणवर्गाचा ङ्गार मोठा वाटा असल्याने ‘स्टार वॉर्स’, ‘द रिंग’ अशा लोकप्रिय चित्रमालिकांतील पात्रांचे पोशाख चढवलेले रोबो देखील जपान-अमेरिकेसारख्या देशांतील ‘थीम-रोबो’ रेस्तोरॉँमध्ये दिसत आहेत!! टॅब, स्मार्टङ्गोन, रोबो-कुक्स, रोबो-वेटर्स इ. वर आधारित असणार्‍या हॉटेलांची ही मनोरंजक माहिती –
खास बनवलेल्या ट्रॅकवरून हा रोबो-वेटर ग्राहकाची ऑर्डर घेऊन जातो. त्याच्यावर व्यवस्थापकाचे लक्ष असते. व्यवस्थापकामागील किचनमध्ये एक शेङ्ग आणि त्याचा यांत्रिक मदतनीस असतो. अशा प्रकारच्या हॉटेलमधील टेबलामध्ये बसवलेल्या टचस्क्रीनवरून ऑर्डर थेट स्वयंपाकघरात पोचवता येते किंवा रोबो स्वतः येऊन आपली ऑर्डर रेकॉर्ड करतो. किचनमधील रोबो (किंवा आचारी) ऑर्डरनुसार डिश बनवतो व ही डिश आपल्या टेबलावर आणून देण्याचे काम रोबो-वेटर करतो. हे रोबो-वेटर्स हॉटेलच्या ङ्गरशीमध्ये आखलेल्या विशिष्ट मार्गावरून जा-ये करतात. ग्राहकांची इच्छा असल्यास, त्यांच्या करमणुकीसाठी, रोबोंचा ‘लाइव्ह बॅँड’ देखील गाणेबजावणे करू शकतो!
प्रत्येक रोबो-वेटर सतत पाच तास पूर्ण क्षमतेने काम करू शकतो. त्यानंतर, बॅटरी चार्ज करण्यासाठी, त्याला दोन तासांची विश्रांती दिली जाते. ह्यांना विजेशिवाय वेगळे खाणेपिणे लागत नाही आणि चार्जिंग व प्रासंगिक देखभालीच्या कालावधीखेरीज हे अतिरिक्त रजाही घेत नाहीत!! हॉटेलच्या संगणक कक्षातील कर्मचारी रोबो-कुक आणि रोबो-वेटर्सच्या पूर्ण टीमवर नियंत्रण ठेवतात. प्रत्येक रोबोची आजची किंमत सुमारे २० हजार पौंड आहे.
आता आपण टॅब-बेस्ड् सर्व्हिस असलेल्या उपाहारगृहांमध्ये डोकावू. अमेरिकेतील ‘ऍपलबीज्’ (अिश्रिशलशश’ी) ह्या हॉटेल-चेनने २०१२ साली आपल्या सर्वच्या सर्व म्हणजे १८०० आउटलेट्‌समध्ये टॅब-आधारित सेवा एकाच वेळी सुरू करून धडाक्याने पहिले पाऊल टाकले. यामुळे ग्राहक, टेबलामध्येच बसवलेल्या (आणि स्वतःच्याही), टॅब्जवरून ऑर्डर देऊ शकतील, ती तयार होईपर्यंत गेम्स खेळू शकतील आणि तिचे बिलदेखील बसल्याजागी देऊ शकतील.
ह्या धोरणामागील खरा उद्देश आहे प्रत्येकाच्या (अक्षरशः) हातात असलेल्या नवतंत्रज्ञानाचा ङ्गायदा घेऊन ऑर्डर घेण्यामध्ये, ती स्वयंपाकघरापर्यंत पोचवण्यामध्ये आणि त्यानंतर ग्राहकाला बिल देऊन त्याने ते अदा करण्यात वाया जाणारा वेळ वाचवणे. जरा विचार केला तर हे पटतेही कारण आपणां सर्वांचेच हे निरीक्षण आणि अनुभवही असतो, मग हॉटेल छोटे असो की मोठे. सुट्टीच्या दिवशी टपरीपासून ङ्गाइव्ह स्टारपर्यंतच्या सर्वच उपाहारगृहांमधील गर्दी आणि टेबल मिळण्याची वाट पाहात थांबलेल्या व्यक्तींची संख्या पाहता अशा तंत्रज्ञानात केलेली गुंतवणूक योग्य वाटते. ‘…गेल्या दोन वर्षांत हे धोरण राबवण्याचा अनुभव उत्साहवर्धक आहे’ असे ऍपलबीज्‌च्या अध्यक्षांचे म्हणणे आहे. यासाठी ऍपलबीज्‌ने ‘प्रेस्टो टॅब्लेट’चा वापर केला आहे. ङ्गक्त चेन-रेस्तोरॉँ नव्हे तर स्वतंत्रपणे चालवलेल्या हॉटेल्समध्येही अशी सेवा देण्याकडे वाढता कल आहे. टेबलात बसवलेल्या टचस्क्रीनचा वापर करून ऑर्डर देता येते, एखाद्या डिशचे छायाचित्र पहायचे असल्यास वा तिच्यातील अन्नघटक जाणून घ्यायचे असल्यास तीही सोय आहे. डिश तयार होऊन टेबलावर येईपर्यंतच्या काळात याच टचस्क्रीनवर एखादा गेम खेळता येतो किंवा सोशल नेटवर्क वापरता येते. खाणे झाल्यावर त्याच स्क्रीनवर बिलाची रक्कम दिसते व ती तेथल्यातेथे – स्वतःचा स्मार्टङ्गोन वापरून – भरता येते.
अर्थात ह्याला दुसरी बाजूही आहे – झपाट्याने होणारे यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानाचा इतका अतिरिक्त वापर जगभरातील बर्‍याच खवय्यांना मुळीच मान्य नाही!! रोबोने बनवलेल्या वा आणून दिलेल्या खाद्यवस्तूंपेक्षा त्यांना उपाहारगृहातील स्वयंपाकी आणि कर्मचारी ह्यांच्यासोबत विकसित होणार्‍या स्नेहसंबंधांचे महत्त्व अधिक आहे. सध्याच धोकादायकरीत्या कमी होत चाललेला मानवी संवाद लक्षात घेता यात काही चुकीचेही वाटत नाही!! परिणामी अशा व्यक्ती रोबो-रेस्तोरॉँची नियमित गिर्‍हाइके कधीच होणार नाहीत तर ते पारंपरिक उपाहारगृहांकडेच वळतील.
शिवाय वेटर्सची संख्या अशा तर्‍हेने कमी झाल्यास जगभरच ‘सर्व्हिस स्टाङ्ग’ उर्ङ्ग सेवाधारित कर्मचार्‍यांवर बेकारीचे संकट ओढवेल. कारण अशा प्रकारच्या हॉटेलांमध्ये, तंत्रप्रणालीने (क्वचित) केलेला एकादा घोटाळा सोडवणे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वसाधारण नजर ठेवणे यापलिकडे, इतर ङ्गारसे कामच राहणार नाही! एकट्या अमेरिकेतच या क्षेत्रातील २५ लाख लोक बेरोजगार होतील म्हणजे पहा. परंतु कर्मचारीवर्गावर होणारा खर्च झपाट्याने वाढत असल्याने आणि त्यातून इतरही काही कटकटी उद्भवत असल्यामुळे मालकवर्ग आणि गुंतवणूकदार ठामपणे तंत्रज्ञानाच्या बाजूने आहेत. पाहू काय होते ते. सध्याच अगदी क्वचित एखाद्याच उपाहारगृहात ऐकू येणारी ‘दोन इस्सम – वीस रुपये!!’ यांसारखी, सणसणीत आवाजात दिली जाणारी, आरोळी आता नामशेष होणार हे मात्र नक्की!!
(डॉ. दीपक शिकारपूर तंत्र उद्योजक, लेखक व सभासद आय टी टास्क ङ्गोर्स (महाराष्ट्र राज्य) म्हणून कार्यरत आहेत.)