चौथ्या दिवशी १२ जणांची उमेदवारी

0
116

>> जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आत्तापर्यंत २१ अर्ज

राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी चौथ्या दिवशी १२ जणांनी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्‍याकडे काल दाखल केले. त्यात उत्तर गोव्यातून ४ आणि दक्षिण गोव्यातून ८ उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. आत्तापर्यंत २१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात उत्तरेतील ९ आणि दक्षिणेतून १२ उमेदवारी अर्जाचा समावेश आहे.

काल उत्तर गोव्यातून धारगळमधून पुंडलिक धारगळकर (अपक्ष), हळदोणामधून मनीषा नाईक (भाजप), प्रवंधना मयेकर (भाजप), होंडातून गणपत गावकर (अपक्ष) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
दक्षिण गोव्यातील दवर्लीतून उल्हास तुयेकर (भाजप), विद्याधर आर्लेकर (भाजप), कुठ्ठाळीतून ब्रिंडा सिल्वा (आप), नावेलीतून माटिल्दा डिसिल्वा (आप), रिवणमधून जुझे आफोन्सो (अपक्ष), संदीप नाईक (आप) यांनी अर्ज दाखल केले.

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या हरमल, धारगळ, हळदोणा, सांताक्रुझ, होंडा, केरी, नगरगाव या सात मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल झाले. तर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या राय, दवर्ली, कुठ्ठाळी, नावेली, रिवण, शेल्डे या सहा मतदारसंघात आत्तापर्यंत उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

मगोपचे १२ उमेदवार जाहीर
मगोपने जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी १२ उमेदवारांच्या नावाची अधिकृत घोषणा काल केली. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या तोरसे मतदारसंघात प्रियांका संदेश महाले, धारगळ मतदारसंघात आत्माराम धारगाळकर, मोरजी मतदारसंघात श्रीधर मांजरेकर, चिंबल मतदारसंघात संदीप वेर्णेकर, मये मतदारसंघात नारायण तारी, सर्वण कारापूर मतदारसंघात योगेश पेडणेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या बेतकी मतदारसंघात विश्‍वजित नाईक, कुर्टी मतदारसंघात – प्रिया च्यारी, वेलिंग प्रियोळ मतदारसंघात दामोदर नाईक, कवळे मतदारसंघात गणपत नाईक, बोरी मतदारसंघात बाबूराव सालेलकर, शिरोडा मतदारसंघात मानुएल क्रुज यांना उमेदवारी दिली आहे.