चोडणकरांचा सरदेसाईंवरील आरोप खोटा : गोवा फॉरवर्ड

0
71

जुने गोवे येथील चर्चसह राज्यातील सहा वारसा स्थळे खासगी संस्थांना दत्तक देण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेविषयी गोवा फॉरवर्डचे नेते तथा मंत्री विजय सरदेसाई यांना माहिती असूनही त्यांनी ती जनतेपासून लपवून ठेवल्याचा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा आरोप खोटा असल्याचे गोवा फॉरवर्डचे प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

सरदेसाई यांना वरील योजनेविषयी माहिती होती असे सिध्द करणारे पुरावे सादर करण्यात चोडणकर यांना अपयशच आले असल्याचे डिमेलो म्हणाले.
पुरातत्व व पुराभिलेख खात्याच्या संचालकांनी यासंबंधी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना जे ‘नोटिंग्ज’ पाठवले होते त्याच्या प्रती त्यांनी खात्याचे मंत्री विजय सरदेसाई यांनाही पाठवले होते हे सिध्द करण्यास चोडणकर यांना अपयश आले असल्याचेही डिमेलो म्हणाले.
आपल्या खात्याचा संचालक अथवा एखाद्या अधिकार्‍याने कुणाला कोणते पत्र लिहिले अथवा पाठवले आहे त्यासंबंधीची सगळीच माहिती मंत्र्याला असतेच असे नाही, असेही डिमेलो म्हणाले.