चीनी लढाऊ विमानांकडून भारतीय हद्दीचे उल्लंघन

0
95

चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मी या हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टर्सनी काल भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. गेल्या मार्चपासून आतापर्यंत चीनच्या हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सकडून झालेले हे चोथे उल्लंघन असल्याचे या सूत्रांनी सांगितले. या घटनेची भारतीय हवाई दल चौकशी करीत आहे. याआधी चिनी हवाई दलाची लढाऊ विमाने ४.५ कि. मी. भारतीय हवाई हद्दीत आली होती.