चीनला वाणिज्य दुतावास बंद करण्याचे आदेश

0
129

अमेरिकेने चीनला ह्यूस्टन येथील वाणिज्य दुतावास ७२ तासांच्या आत बंद करण्याचे फर्मान सोडले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी याची माहिती दिली. अमेरिका व चीन यांच्यातील संबंधात दिवसेंदिवस तणाव वाढत चालला आहे. चीन विरोधात टीका करणार्‍या ट्रम्प प्रशासनाने चीनला आणखी एक धक्का दिला आहे.