चीनने समुद्रावरील उभारला लांब पूल

0
85

बीजिंग
चीनने समुद्रावर जगातील सर्वात लांब पूल उभारला आहे. जवळपास ५५ किलोमीटर लांबीचा हा पूल आहे. या पुलाच्या बांधणीसाठी ८ अब्ज डॉलरचा खर्च आला आहे. या पुलाचे काम २००९ मध्ये हाती घेण्यात आले होते. २४ ऑक्टोबरला हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार आहे. चीनमधील ११ शहरांमधून हा पूल जातो. हा पूल भूकंप, वादळ आणि माल वाहतूक करणार्‍या बोटींपासूनही सूरक्षित राहू शकतो. चीनच्या ग्रेटर बे परिसरात हा पूल आहे. हा पूल जवळपास ५६ हजार ५०० चौरस किलोमीटरचा परिसर हा पूल व्यापतो.