चिरेखाणीत बुडालेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले

0
114

तुये-पेडणे येथील डॉन बॉस्को विद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहणारे चार विद्यार्थी शनिवारी चिरेखणीत बुडाले होते. त्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात अग्निशामक दलाला यश आले.
रात्री उशीरा मिळालेला विद्यार्थ्याचा मृतदेह हा वारखंड-पेडणे येथील प्रिन्स झा (११) याचा असून हा मुलगा सहावीत शिकत होता. सध्या तो वारखंड येथे राहत होता. मात्र गेली दोन वर्षे तो तुये डॉन बॉस्कोच्या हॉस्टेलमध्ये राहत होता अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

शनिवारी सायंकाळी ४.१५ वा. एकूण ४४ विद्यार्थ्यांचा गट हा हायस्कूलपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावरील पठारावर ट्रॅकिंगला गेला होता. या विद्यार्थ्यांसोबत तीन शिक्षक होते. यापैकी पाच विद्यार्थी हे पुढे जाऊन पोहण्यासाठी गेले. त्यातील चार विद्यार्थी बुडाले तर एकजण पोहून वर आला. मात्र बुडालेल्या विद्यार्थ्यांनी टीशर्ट व हाप पँट परिधान केली होती. त्यांच्याकडे ट्रॅकिंगचे कुठल्याच प्रकारचे साहित्य तसेच बूट आढळले नसल्याचे पेडणे पोलिसांनी सांगितले.

बुडालेल्या विद्यार्थ्यांपैकी फेड्रिक फर्नांडिस (१४) मुंबई, दानिश नाझारेथ शेख (१४) मुंबई हे मुंबईचे असून त्यातील. दानिश हा पूर्वी ओल्ड गोवा येथे राहत होता अशी माहिती मिळाली. तर जोनस फेलिक्स डायस (११) हा कुंकळ्ळी येथील असून प्रिन्स झा (११) हा वारखंडे पेडणे येथील विद्यार्थी आहे. पेडणे पोलिसांनी तीन शिक्षकांच्या तसेच ट्रॅकिंगमध्ये सहभागी असलेल्यांच्या जबान्या घेण्याचे काम सुरू केले आहे.