चिदंबरमना ५ दिवसांची कोठडी

0
105

आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केलेले कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांना जामीन नाकारण्यात आला असून त्यांना २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयच्या राउज ऍव्हेन्यू कोर्टाने हा निर्णय दिला. यावेळी कोर्टाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, कोर्टाने चिदंबरम यांना दररोज अर्धा तास कुटुंबीय आणि वकिलांना भेटण्याची परवानगी दिली आहे.

तीन तास कसून चौकशी केल्यानंतर सीबाआयने चिदंबरम यांना साडे तीन वाजता राउज ऍव्हेन्यू कोर्टात आणले. यावेळी छोट्या कोर्ट रुममध्ये आणल्याबद्दल चिदंबरम यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. सुनावणीवेळी चिदंबरम हे चौकशीला सहकार्य करत नसल्याने त्यांच्या चौकशीसाठी त्यांना पाच दिवसांची कोठडी देण्यात यावी, अशी विनंती सीबीआयने कोर्टाला केली. आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी चिदंबरम यांची चौकशी करायची असल्याचेही सीबीआयने कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टाने चिदंबरम यांची २६ ऑगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत रवानगी केली.

यावेळी सीबीआयचे वकील सॉलिसिटर जनरल तुषारमेहता यांनी चिदंबरम यांनी त्यांच्या पदाचा दुरुपयोग केल्याचा दावा केला. आयएनएक्स मीडियाने चुकीच्या पद्धतीने एङ्गडीआय वसुली केली. एङ्गआयपीबीच्या नियमांचे उल्लंघन करून ही वसुली करण्यात आली. त्यामुळे आएनएक्सला ङ्गायदा मिळाला. त्यामुळे या कंपनीने इतर कंपन्यांनाही पैसे दिले, असे मेहता यांनी सांगितले. मौन पाळणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. पण जाणूनबुजून प्रश्‍नांची उत्तरे टाळणे हे चुकीचे आहे. त्यामुळे चौकशी पूर्ण करण्यासाठीच चिदंबरम यांना कोठडी मिळणे गरजेचे आहे, असा युक्तिवाद मेहता यांनी केला.