चित्रनगरी ‘हैदराबाद’!

0
218

प्रा. रामदास केळकर

गिनीज बुकमध्ये नोंद झालेले पक्षीही इथे पहायला मिळतात. इथल्या पक्ष्यांना उन्हाची झळा बाधू नये म्हणून पंखे, वाळ्याचे पडदे टांगलेले आहेत. दर तासागणिक ते पाण्याने ओले केले जातात. संपूर्ण स्टुडीओ बघता यावा यासाठी रेल्वे पद्धतीची वाहतूक उपलब्ध आहे.

पर्यटनाबरोबर शैक्षणिक दौर्‍याचे ङ्गोरमतर्ङ्गे प्रत्येक वर्षी आयोजन केले जाते. प्रत्येक दौर्‍याचा अनुभव वेगवेगळा असतो कारण प्रत्येकवेळी ठिकाणे बदलत जातात. बंगलुरु, त्रिवेन्द्रम, दिल्ली, नैनिताल, कार्बेट अभयारण्य, माउंट अबू तर यावेळी आम्ही निवड केली होती तेलंगणातील हैद्राबादची. सायबर सिटीमुळे तसेच तेलंगण निर्मितीमुळे ह्या शहराबद्दल एक आकर्षण होते. शिवाय आंध्रप्रदेशची राजधानी तसेच मोती, हिर्‍याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध म्हणूनही ओढा होताच. शिवाय बंगलुरु आणि चेन्नई शहराबरोबर सायबरसिटीचे स्पर्धक आहे हे शहर. ङ्गोरमचे अध्यक्ष प्रा सुदन बर्वे आणि दौर्‍याचे आयोजक प्रा. दामोदर पंचवाडकर ह्यांच्यासह आम्ही सर्व सदस्य रेल्वेने ह्या पूर्वीच्या भागनगरकडे निघालो. जाण्यापूर्वी अनेकांनी तेथील वाढत्या पार्‍याची जाणीव करून दिली होती. पण आमचा दौरा ह्याच अवधीत करण्याचा आमचा अनेक वर्षांचा रिवाज यंदा आम्ही मोडू शकत नव्हतो.
एरव्ही आपली रेल्वेस्थानके कचरा, घाणीसाठी बदनाम झालेली पण सकाळी सात वाजता हैद्राबादच्या स्थानकावर चक्क स्वच्छतेने आमचे स्वागत केले. तिथे किशोर शिंदे हा अष्टविनायकचा पर्यटक मार्गदर्शक आमच्या दिमतीला होता. त्याने आमच्या हाती दौर्‍याच्या कार्यक्रमाची पत्रिका थोपविली. थोडावेळ हॉटेलमध्ये विसावा घेऊन आमच्या दौर्‍याला आरंभ झाला बिर्ला मंदिराच्या भेटीने. गल्ली बोळातून एका उंच टेकडीवर हे धवल रंगाचे मंदिर वसलेले आहे. स्थापत्यविशारदाच्या निर्मितीचे कौतुक करावे ते वेगळेच. अपेक्षेप्रमाणे उन्हाचा पारा वाढला होता पण शुभ्र ङ्गरशीवरून चालताना त्याचे चटके जाणवले नाही. अर्थात काही ठिकाणी कार्पेट घातले होते. मंदिराच्या आवारातून खाली पसरलेले हैद्राबाद शहर, विस्तीर्ण हुसेन सागर आणि मध्ये उभारलेला बुद्धाचा पुतळा दिसत होता. तेथून आमची चमू नेहरू उद्यानाकडे पोचली. हे उद्यान प्रशस्त असल्याने तेथे उपलब्ध असलेल्या इकोङ्ग्रेंडली मोटरने उद्यानाला ङ्गेरङ्गटका मारला. बंगालचा प्रसिद्ध वाघ, तरस, गेंडा, जिराङ्ग, हरणे, हत्ती, काळवीट, कोल्हे, मगरी आदींचे व्यवस्थित दर्शन घेताना वेगळाच आनंद मिळाला. ह्या अभयारण्यातील प्राण्यांना दत्तक घेण्याची इथे व्यवस्था आहे. कमीतकमी पाच हजार रुपये देणगी देऊन तुम्ही त्यांना दत्तक घेऊ शकता. विशेष म्हणजे ह्या देणगीला तुम्हाला करमाङ्गी मिळते. आमच्यातील काहींनी निवृत्त झाल्यानंतर शक्य तेव्हढी देणगी द्यायचे मनोमन ठरविले आणि आम्ही हुसेन सागरकडे निघालो. संध्याकाळची वेळ म्हणजे नुसती जत्रा. सुट्टी असल्याने लहान मुले, त्यांचे पालक ह्यांची गर्दी जमली होती. आमच्या चमूने स्वतंत्र बोट घेऊन सागराला वळसा घातला. गौतम बुद्धाची मधोमध असलेली मूर्ती हे इथले आणखी एक आकर्षण. जवळच जायंट व्हीलप्रमाणे उंच उंच नेणारा पाळणा भौतिकशास्त्राची आवड निर्माण करणारा आहे. एव्हाना लेझर शोची वेळ झाली होती. त्यासाठी तिकीटाच्या रांगेत आम्ही राहिलो होतो. तेवढ्यात नभ मेघांनी भरून गेले आणि विजाही चमकू लागल्या. पारा एकदम खाली जाऊन गार वार्‍याची सुखद अनुभूती मिळाली पण ह्या समाधानात लेझर शो रद्द केल्याची कडू बातमी सर्वाना निराश करून गेली.
दुसरा दिवस प्रसिद्ध पत्रकार, चित्रपट निर्माते व इ-टीव्हीचे जनक श्री रामोजीराव यांनी स्थापन केलेल्या इलम सिटीला भेटीचा होता. एकूण सहाशे एकर प्रशस्त जागेत ही ङ्गिल्म सिटी विस्तारलेली आहे. ज्यांना देश परदेशात आपल्या चित्रपटाचे चित्रण करता येत नाही त्यांना ही नगरी म्हणजे पर्वणी आहे. अर्थात प्रसिद्ध निर्मातेही ह्या जागेची पसंती करतात. इथे शाही विवाह, पार्ट्याचेही आयोजन होते. आशियातील सर्वात मोठी चित्रनगरी अशी त्याची ख्याती आहे. इथे सिनेमाच्या बरोबरीने पर्यावरणालाही तेवढेच महत्व दिलेले आहे. ङ्गुलपाखरांचा जिवंत संग्रहालय, पक्ष्यांचा जिवंत संग्रहालय नमूद करण्यासारखे. पक्ष्यांमध्ये परदेशांतील पोपट पहायला मिळतात. काहींचे आयुष्य तीस पस्तीस वर्षे एवढे आहे ह्याची माहिती मिळाली. गिनीज बुकमध्ये नोंद झालेले पक्षीही इथे पहायला मिळतात. इथल्या पक्ष्यांना उन्हाची झळा बाधू नये म्हणून पंखे, वाळ्याचे पडदे टांगलेले आहेत. दर तासागणिक ते पाण्याने ओले केले जातात. संपूर्ण स्टुडीओ बघता यावा यासाठी रेल्वे पद्धतीची वाहतूक उपलब्ध आहे. ह्याशिवाय प्रशस्त वातानुकुलीत थियेटरमध्ये वेगवेगळे शो पाहणे हा एक वेगळा अनुभव होता.
तिसरा दिवस सालारजंग म्युझियम, गोवळकोंडा किल्ला तसेच सेंटर इंस्टीट्यूट ऑङ्ग इंग्लिश एंड ङ्गॉरेन लँग्वेज ही संस्था पाहण्यासाठी होता. ओस्मानिया विद्यापीठाच्या जवळ १९५८ पासून कार्यरत असलेल्या ह्या संस्थेच्या आवारात २०० वर्षापूर्वीची दोन मजली क्षमतेची विहीर सापडली होती. भाषेच्या अध्ययनासाठी प्रसिद्ध असलेल्या ह्या संस्थेत इंग्रजी बरोबर जर्मन, रशियन, पर्शियन, इटलीयन, कोरियन, चायनीज आदी परदेशी भाषांचे अध्ययन करता येते. ह्या संस्थेला विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. परीक्षा चालू असल्याने आम्हाला एकाच अधिकार्‍याला भेटता आले. त्याने आम्हाला संस्थेचे माहितीपुस्तक दिले. ‘गोवळकोंडा’ हा तेलगु शब्द. त्याचा अर्थ ‘गुराख्यांचा डोंगर’! अगदी अखेरीला हा किल्ला औरंगजेबच्या ताब्यात होता. सालारजंग म्युझियम हे आणखी एक आकर्षण. पूर्वीच्या हैद्राबादचा पंतप्रधान सालारजंग ह्यांचा हा संग्रह. आता त्यात भर घालून आधुनिकता दिलेली आहे. निझामच्या दागदागिन्याचे प्रदर्शन खास प्रसंगी केले जाते. राष्ट्रीय तीन प्रमुख संग्रहालयात त्याचा समावेश केला जातो. इंग्लंडच्या कुक आणि केल्वीकडून आणलेले संगीत घड्याळ हे ह्या म्युझियमचे प्रमुख आकर्षण. ह्यामध्ये दर तासाला टोले वाजवायला येणारे टाइमकीपर हे आकर्षण असते. बहुतेक पर्यटक अकरा किंवा बारा वाजताच्या वेळी तिथे गर्दी करतात, कारण त्यावेळी जास्त वेळा ही गंमत पाहता येते.
अखेरच्या दिवशी मोत्यांची अधिकृत दुकाने पाहून आणि कराची बेकरीला भेट देऊन वेगळा अनुभव घेऊन आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.