चिखली इस्पितळाचे लवकरच लोकार्पण करणार

0
91
हेडलॅण्ड - सडा येथील संयोगम् कला संघ या विजेत्या पथकासह पंचायत मंत्री माविन गुदिन्हो. बाजूला चंद्रकांत गवस, सुदेश भोसले व इतर मान्यवर.

वास्को (न. प्र.)
चिखली येथील लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या उप-जिल्हा इस्पितळाच्या उद्घाटनाला या इस्पितळाला लागणार्‍या नोकरभरतीमुळे उशिर झाला असून नोकर भरतीची प्रक्रिया पूर्ण करुन लवकरच इस्पितळाचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.
नवेवाडे येथील निवेदम् सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडा संस्थेतर्फे आयोजित अकराव्या अखिल गोवा दांडिया गरबा नृत्य स्पर्धेचा बक्षीस वितरण कार्यक्रमावेळी ते प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निवेदम् नवरात्रोत्सव समिती २०१८ चे अध्यक्ष गौरीश नाईक, रवींद्र भवन बायणाचे कार्यकारी सदस्य सुदेश भोसले, मुरगाव नगरपालिका नगरसेवक राजन फळदेसाई, गौरीश म्हार्दोळकर, यतिन कामूर्लेकर, माजी नगरसेविका चित्रा गवस, समाजसेवक ब्रह्मा पवार, साईनाथ आमोणकर, अशोक झेमणे, चंद्रकांत गवस, महेश कोरगावकर, आपा साळगावकर, दीपक नाईक, सर्वेश शिरोडकर, अजय सावंत, मंगलदास नार्वेकर, नागेश वेरेकर, कौशिक नाईक, दिपेश नाईक, शुभम नाईक, चेतन पैराशी, दाबोळी भाजपा महिला मोचा अध्यक्ष अनिल थोरात, संतोष केरकर, सचिन चौगुले, बोगमाळो पंचायत पंच संकल्प महाले, शशि कांदोळकर, गोविंद साखळकर, अजय थोरात, मारीडा मेस्त, लिगोरो मोन्तेरो, लक्ष्मण कवळेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान निवेदम् सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रिडा संस्था व अमित ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नवेवाडे येथे वाडे नगर शाळेच्या क्रीडा मैदानावर आयोजित ११ व्या अखिल गोवा दांडिया गरबा नृत्य स्पर्धेत प्रथम बक्षीस रुपये २५ हजार व चषक तसेच फिरता चषक सडा येथील संयोगम कला संघाला प्राप्त झाले. स्पर्धेचा सविस्तर निकाल पुढील प्रमाणे – दुसरे बक्षीस रुपये १५ हजार व चषक निर्भय भव (पर्वरी), तिसरे बक्षीस रुपये १० हजार व चषक – डायनेमीक आर्ट एन्टरटेनमेन्ट (पणजी), तर चौथे बक्षीस रुपये ५ हजार व चषक – ब्लोसोम ग्रुप (साखळी) यांना अनुक्रमे प्राप्त झाली. तसेच प्रथम तीन विजेता पथकांना मुंचीयल गोल्ड प्लाझाने पुरस्कृत केलेले रौप्य नाणी भेटविण्यात आले. याव्यतिरिक्त दुधसागर रिसोर्ट ऍण्ड स्पॉ दुधसागरतर्फे एक रात्र राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
स्पर्धेचे परीक्षण महेश गोवेकर, वृन्दा लखानी व लाडू परवार यांनी केले. संपूर्ण स्पर्धेचे सूत्रनिवेदन सुदेश भोसले यांनी केले.